उपसरपंचपदासाठी अशोक झलवार व अनिल दसरे यांनी अर्ज दाखल केले होते. यातून अनिल दसरे यांनी अर्ज मागे घेतल्याने अशोक झलवार बिनविरोध निवडून आले. तर सरपंचपदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत नजीर अहेमद यांना दहा तर महेबूब खान यांना सात मते मिळाल्याने सरपंचपदी नजीर अहेमद यांची निवड झाली. यावेळी अध्याशी अधिकारी म्हणून बी. के. माळी यांनी काम पाहिले. त्यांना गणेश सैवर यांनी सहकार्य केले. यावेळी सदस्य समी चाऊस, अण्णू ढाकरे, महेबूब खान, प्रवीण बिरारे, लीलाबाई झलवार, आजम खान, अशोक झलवार, शकीला बी रफीक पठाण, नजीर अहेमद, अलकाबाई चौडीये, जमीलाबी अहेमद, लालूखान, विद्या दसरे, शेख बिसमिल्ला बी रशीद, अनिल दसरे, माधुरी देशमुख, सईदा बेगम खान यांची उपस्थिती होती.
फोटो : अजिंठा
140221\img_20210208_194146_1.jpg
अजिंठा