शहरात पहिल्यांदाच लेदर बॉलवर स्पर्धा झाली. यात तालुक्यातील १५ संघांनी सहभाग नोंदवला होता.
अंतिम लढतीत एन.बी.सी. संघाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत निर्धारित १५ षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात १२७ धावा केल्या होत्या. यात कर्णधार अनिकेत काळेने २६ चेंडूंत ४५ व यष्टीरक्षक ओमकार साबनेने २८ चेंडूत ४४ धावा कुटल्या. धावांचा पाठलाग करताना प्रतिस्पर्धी संघ १०४ धावा करू शकला. बंटी कांगडाने ४ तर अनिकेत काळेने ३ गडी बाद केले. स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या अनिकेत काळेला सामनावीर व मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विजेत्या व उपविजेत्या संघाला माजी नगराध्यक्ष संजय जाधव, तुकाराम सटाले, संतोष अंबिलवादे, अमोल जगताप, राकेश कळसकर, नगरसेवक ज्ञानेश्वर साबणे, मुकुंद जोशी, सुरेश नेमाडे, योगेश पाटील यांचे हस्ते चषक गौरविण्यात आले.
-- विजेत्या संघास चषक देताना मान्यवर.
240221\20210222_223225_1.jpg
-- विजेत्या संघास चषक देताना मान्यवर.