राष्ट्रवादीचा 'कॉंग्रेस'ला पुन्हा धक्का; आता गंगापूरच्या माजी नगराध्यक्षांचा ५ नगरसेवकांसह प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 06:08 PM2022-02-10T18:08:42+5:302022-02-10T18:11:22+5:30

गंगापूरमध्ये ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का 

NCP dominates Congress again; Former Mayor of Gangapur enters with 5 corporators in NCP | राष्ट्रवादीचा 'कॉंग्रेस'ला पुन्हा धक्का; आता गंगापूरच्या माजी नगराध्यक्षांचा ५ नगरसेवकांसह प्रवेश

राष्ट्रवादीचा 'कॉंग्रेस'ला पुन्हा धक्का; आता गंगापूरच्या माजी नगराध्यक्षांचा ५ नगरसेवकांसह प्रवेश

googlenewsNext

गंगापूर ( औरंगाबाद ) : माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विद्यमान पाच नगरसेवकांसह राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला; मागील काही दिवसांपासून काँग्रेस पक्षावर नाराज असलेले जाधव हे पक्षांतर करणार असल्याचे बोलले जात होते; त्यांच्या पक्षांतराने शहरात प्राबल्य असलेल्या काँग्रेस पक्षाला पालिका निवडणुकीच्या तोंडावर खिंडार पडले आहे. दरम्यान, मागील महिन्यातच मालेगाव मधील काँग्रेसच्या २७ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला हा दुसरा धक्का बसला आहे. 

यावेळी जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, आमदार सतीश चव्हाण, खादि ग्रामउद्योग मंडळाचे संतोष माने, तालुकाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर निळ, वाल्मिक सिरसाट, फैसल चाऊस यांची उपस्थिती होती.मागील पालिका निवडणुकीचा व अपवाद वगळता जाधव यांची वीस वर्ष्यापासून गंगापूर पालिकेवर पकड आहे; डिसें.२०१६ मध्ये झालेल्या निवडणुकित सेना भाजपाची युती होती तर काँग्रेस-राष्ट्रवादी स्वतंत्र लढले होते सेनेचे सर्वाधिक ८ काँग्रेसचे ७ तर २ नगरसेवकांसह नगराध्यक्ष पदासाठी थेट जनतेतून झालेल्या निवडणुकीत भाजपचा नगराध्यक्ष झाला होता याच अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जाधव यांच्या पत्नी काँग्रेस उमेदवार सुवर्णा जाधव जवळून पराभूत झाल्या होत्या.

विपरीत परिस्थितीत पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले असतांना देखील पक्षाच्या वतीने गंगापूरकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आल्याने व पालिका निवडणुकीत पाहिजे तसे सहकार्य न मिळाल्याने जाधव यांनी अनेकदा पक्ष श्रेष्टीकडे व शहरात झालेल्या कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली होती तरी देखील पक्षाने त्यांची दखल घेतली नाही त्यामुळे त्यांनी अखेर काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. तालुक्याच्या तुलनेत शहरात कॉंग्रेस मजबूत होती मात्र आता जाधव यांच्या सोबत विद्यमान पाच नगरसेवकांनी 'घड्याळ' बांधल्याने काँग्रेसला मोठे खिंडार पडले असून पक्षाला अनेक वार्डात उमेदवार शोधावे लागणार आहे; तर जाधव यांच्या प्रवेशाने पालिकेत सध्या एक देखील नगरसेवक नसलेल्या राष्ट्रवादीची ताकद किती वाढणार हे येणाऱ्या पालिका निवडणुकीत दिसून येईल; यावेळी ज्ञानेश्वर साबने,सुरेश नेमाडे,योगेश पाटील,अशोक खाजेकर, मोहसीन चाऊस या पाच नगरसेवकांसह बाजार समितीचे सहा संचालक तसेच अमोल जगताप, सोपानराव देशमुख, तुकाराम सटाले,राकेश कळसकर, राजेंद्र दंडे नवनाथ कानडे, सचिन भवार,हनिफ बागवान, गुलाम शहा, दिनेश गायकवाड, उमेश बाराहते आदींनी प्रवेश केला.

लोकमतचा अंदाज खरा ठरला
काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत मागील आठवड्यात पक्षाची आढावा बैठक झाली होती. यावेळी जाधव आपल्या समर्थकांसह गैरहजर होते. तेव्हाच ते पक्षांतर करणार असा अंदाज 'लोकमत' वर्तवला होता.

Web Title: NCP dominates Congress again; Former Mayor of Gangapur enters with 5 corporators in NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.