शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

राष्ट्रवादी, सेना-भाजपचे शेतकरी एकता पॅनल

By admin | Published: March 14, 2016 12:02 AM

नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना-भाजपाने शेतकरी एकता पॅनल तयार केले आहे़ शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र येत निवडणूक लढवित आहोत

नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना-भाजपाने शेतकरी एकता पॅनल तयार केले आहे़ शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र येत निवडणूक लढवित आहोत, अशी माहिती पॅनल प्रमुख भगवानराव पाटील आलेगावकर यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली़ आमदार हेमंत पाटील, आ़ प्रतापराव पाटील चिखलीकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आ़ बापूसाहेब गोरठेकर, शहर जिल्हाध्यक्ष डॉ़ सुनील कदम, माजी खा़भास्करराव पाटील खतगावकर, माजी आ़ओमप्रकाश पोकर्णा यांची प्रमुख उपस्थिती होती़आलेगावकर म्हणाले, बाजार समित्या सक्षम करण्यासाठी मुदखेड, अर्धापूर येथे स्वतंत्र बाजार समिती असावी, अशी आमची मागणी आहे़ सत्तेचे विकेंद्रीकरण करून शेतकऱ्यांचे हित जोपासता येईल़ अर्धापूर भागात केळीचे उत्पादन अधिक आहे़ मात्र, मार्केट नांदेडला असल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो़काँग्रेसला आव्हान देण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र लढत असल्याचे आ़ हेमंत पाटील यांनी सांगितले़ तर आ़ चिखलीकर म्हणाले, आमच्या पॅनलमध्ये सेना - भाजपा - राष्ट्रवादी असा कोणताही भेदभाव नाही़ माजी आ़ पोकर्णा यांनी बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळावर गैरव्यवहाराचे आरोप केले़ डॉ़सुनील कदम म्हणाले, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शेतकरी एकता पॅनल रिंगणात उतरविला आहे़ दरम्यान, बापूसाहेब गोरठेकर, माजी खा़ भास्करराव पाटील खतगावकर यांनीही मनोगत व्यक्त केले़ पॅनलमधील उमेदवार जाहीरसहकारी संस्था मतदारसंघ-भगवानराव पाटील आलेगावकर, रमेश पावडे, मोतीराम मोरे, दत्ता पाटील पांगरीकर, रमेशराव धुमाळ, भीमराव देशमुख, गंगाराम गोदगे, पद्मीनबाई शिंदे, कान्होपात्रा कंकाळ, विठ्ठल पाटील नांदुसेकर, शंकर वापटकर, ग्रामपंचायत मतदारसंघ - नारायण कदम, बाबूराव पावडे, पुष्पाबाई बारसे, अजय सरपाते, व्यापारी मतदारसंघ - ओमप्रकाश पोकर्णा, सदाशिव देशमुख तर हमाल- मापाडी मतदारसंघातून सूर्यकांत स्वामी यांना उमेदवारी देण्यात आली आहे़ पत्रपरिषदेस धोंडू पाटील, अ‍ॅड़किशोर देशमुख, प्रवीण गायकवाड, अशोक सूर्यवंशी, भुजंग पाटील डक, मिलिंद देशमुख, दीपक पावडे, विनय सगर, सरपंच नारायण कदम यांच्यासह पॅनलमधील उमेदवार उपस्थित होते़ (प्रतिनिधी)