शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 07:27 PM2024-10-24T19:27:40+5:302024-10-24T19:28:31+5:30

NCP Sharad Pawar Candidate List : राष्ट्रवादीने (शरदचंद्र पवार) आज अखेर आपली पहिली यादी जाहीर केली आहे.

NCP Sharad Pawar Candidate First list, see Marathwada candidates | शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...

शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...

NCP Sharad Pawar Candidate List : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज अखेर शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या पहिल्या यादीत एकूण 45 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही यादी जाहीर केली. तसेच, पुढील दोन दिवसांमध्ये उर्वरित उमेदवार जाहीर होणार आहेत.

या पहिल्या यादीत मराठवाड्यातील उमेदवारांचाही समावेश आहे. 45 पैकी 10 उमेदवार मराठवाड्यातील आहेत. पक्षाने जालन्याचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांचे पूत्र आणि भोकरदनचे आमदार संतोष दानवे यांच्याविरोधात चंद्रकांत दानवेंना उमेदवारी दिली आहे. याशिवाय, पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनाही आष्टीतून उमेदवारी जाहीर केली आहे. तर, राजेश टोपे यांना पुन्हा घनसावंगीची उमेदवारी मिळाली आहे. टोपेंसमोर अलीकडेच शिंदे गटात गेलेल्या हिकमत उढाण यांचे तगडे आव्हान असणार आहे.

विशेष म्हणजे, शरद पवार गटाने मराठवाड्यातील आपले सर्व उमेदवार अद्याप जाहीर केले नाहीत. मराठवाड्यातील काही महत्वा मतदारसंघांपैकी असलेल्या परळी, बीड आणि माजलगावचा उमेदावर अद्याप जाहीर झालेला नाही. बीडमध्ये संदीप क्षिरसागर यांच्या उमेदवारीला पक्षातून विरोध असल्यामुळे उमेदवार कोण असेल, हे पाहणे महत्वाचे आहे. याशिवाय, माजलगाव आणि परळीमधून अजित पवार गटात गेलेल्या प्रकाश सोळंके आणि धनंजय मुंडेंसारख्या मत्तबर नेत्यांसमोर कोणाला उमेदवारी द्याययी, हे पक्षासमोर मोठे आव्हान असणार आहे. 

पाहा शरद पवार गटाचे मराठवाड्यातील उमेदार

भोकरदन- चंद्रकांत दानवे
घनसांगवी-राजेश टोपे
आष्टी-मेहबूब शेख
अहमदपूर- विनायकराव पाटील
वसमत- जयप्रकाश दांडेगावकर
उदगीर- सुधाकर भालेराव
किनवट- प्रदीप नाईक
जिंतूर- विजय भांबळे
केज- पृथ्वीराज साठे
बदनापूर- बबलू चौधर
 

शरद पवार गटाची संपूर्ण यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

Web Title: NCP Sharad Pawar Candidate First list, see Marathwada candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.