शिऊर बंगला येथे माजी आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. अच्छे दिनच्या नावाखाली केंद्र सरकारकडून जनतेची दिशाभूल चालू असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी केला. भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून सातत्याने दरवाढ झाल्याने पेट्रोल, डिझेल शंभरीपर्यंत पोहोचले आहे. गॅसचे दर वाढले आहेत. यामुळे सर्वसामान्य माणसांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. केंद्र सरकार केवळ भाजपशासित राज्यांनाच मदत करीत आहे. याचा राष्ट्रवादीतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात कृउबाचे सभापती भागिनाथ मगर, तालुकाध्यक्ष प्रतापराव निंबाळकर, उपसभापती राजेंद्र मगर, माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब भोसले, दत्तू त्रिभुवन, कार्याध्यक्ष उत्तम निकम, सुभाष जाधव, शहराध्यक्ष प्रेम राजपूत, युवक तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे, आनंद निकम, दिगंबर मोरे, अनिल भोसले, राहुल साळुंके, बाळा जाधव, अकबर शेख आदींची उपस्थिती होती.
फोटो : शिऊर बंगला येथे इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करताना राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते.
090621\img-20210609-wa0163.jpg
डिझेल पेट्रोल दरवाढीच्या विरोधात शिऊर येथे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले