औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण प्रणित उत्कर्ष पॅनलच्या उमेदवारांची विजयी घौडदौड सुरू आहे. राखीव प्रवर्गातील 5 जागांचे निकाल शुक्रवारी सकाळपर्यंत जाहीर झाले. यातील 5 ही जागा उत्कर्ष पॅनलच्या उमेदवारांनी मोठ्या फरकाने जिंकल्या आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना दारुण पराभव स्वीकारावा लागला.उत्कर्ष पॅनलच्या विजयी उमेदवारांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गात प्रा. सुनील मगरे, अनुसूचित जमातीमध्ये सुनील निकम, ओबीसींमध्ये सुभाष राऊत, व्हीजेएनटी गटात संजय काळबांडे आणि महिला गटात शीतल माने यांनी विद्यापीठ विकास मंचाच्या उमेदवारांवर दणदणीत विजय मिळवला आहे. विजयी उमेदवारांनी ठरवून दिलेला कोटा पूर्ण करत अतिरिक्त मते घेत विजय मिळवला आहे. उर्वरित खुल्या प्रवर्गातील मतमोजणीला सकाळी 7 वाजता सुरुवात झाली आहे. या गटातील निकाल दुपारपर्यंत हाती येण्याची शक्यता आहे. अधिसभेच्या राखीव प्रवर्गात पात्र ठरलेली मते, अपात्र मते आणि विजयासाठी ठेवलेला कोटा दिलेला आहे. तसेच त्याखाली उमेदवांनी घेतलेली मते ही देण्यात आली आहेत.अनुसूचित जाती प्रवर्गपात्र मते - 14445अपात्र मते- 2465कोटा-7223उमेदवारांना पहिल्या पसंतीची मिळालेली मतेप्रा.सुनिल मगरे8504पंकज भारसाखले1904बाबासाहेब भालेराव820प्रशांत पवार1097वाहुळकर534प्रकाश इंगळे760घाटे280शिरीष कांबळे337उत्तम कांबळे209अनुसूचीत जमाती प्रवर्गपात्र मते- 13913अपात्र मते- 2997कोटा- 6957उमेदवारांना पहिल्या पसंतीची मिळलेली मतेसुनील निकम9421भागवत बरडे1656राजू सूर्यवंशी2836व्हिजेएनटी प्रवर्गपात्र मते- 13858अपात्र मते- 3052कोटा- 6930उमेदवारांना पहिल्या पसंतीची मिळालेली मतेसंजय काळबांडे8041काकासाहेब शिंदे2546पूनम सलामपूरे1157राखमाजी कांबळे1159हनुमंत गुट्टे965ओबीसी प्रवर्गपात्रमते - 14010अपात्रमते - 2900कोटा- 7006उमेदवारांना पहिल्या पसंतीची मिळालेली मतेसुभाष राऊत8923तुषार वखरे1124राजीव काळे3533वीरकर430महिला प्रवर्गपात्र मते- 14041अपात्र मते- 2869कोटा- 7021उमेदवारांना पहिल्या पसंतीची मिळलेली मतेशीतल माने 7407योगीता तौर 4095पल्लवी बोर्डे 810अनघा देशमुख 962सुचेता इंगळे 767(ही आकडेवारी मतदान निर्णय अधिकाऱ्यांनी घोषणा करतांना लिहून घेतलेली आहे.)
औरंगाबाद विद्यापीठ अधीसभेच्या पदवीधर गटात राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित उत्कर्ष पॅनेलची विजयी घौडदौड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 7:29 AM