शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

औरंगाबादमधील ‘मेडिकल टुरिझम’ला हवे ‘टेकआॅफ’चे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 3:24 PM

मेडिकल टुरिझम वाढीसाठी विमानसेवेचा विस्तार होणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देविमानसेवा वाढीकडे लक्ष देण्याची गरज  परदेशांतून उपचाराकरिता शहरात येण्यासाठी मिळावे प्रोत्साहन

औरंगाबाद : शहरात पुणे, मुंबईसारख्या महानगरांप्रमाणे वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत. उपचाराचा खर्चही तुलनेत औरंगाबादेत कमी आहे. त्यामुळे औरंगाबादला मेडिकल टुरिझम खुणावत आहे; परंतु मर्यादित विमानसेवेमुळे त्यास खोडा बसतो. त्यामुळे मेडिकल टुरिझम वाढीसाठी आणि रुग्णांच्या उपचारासाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा विस्तार होणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

चिकलठाणा विमानतळावर सध्या एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रू जेट कंपनीची विमानसेवा सुरूआहे. या तीन कंपन्यांच्या सेवेमुळे औरंगाबाद, दिल्ली, मुंबई, हैदराबाद, तिरुपतीशी हवाई सेवेने जोडलेले आहे. एकेकाळी शहरातील बहुतांश हृदयरोगी उपचारासाठी पुणे-मुंबई येथे जात होते. मात्र, आता हृदयरोगावरील उपचार, अवयव प्रत्यारोपासह बहुतांश आजारांवरील उपचार शहरातच शक्य झाले आहेत. शहरात अत्याधुनिक सोयीसुविधांयुक्त रुग्णालये आणि तज्ज्ञ डॉक्टर आहेत. विविध रुग्णालयांमध्ये परदेशातून आजघडीला ४०० ते ५०० परदेशी रुग्ण दरवर्षी उपचारासाठी दाखल होतात. विशेषत: आखाती देशांतून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेणी पाहण्यास जगभरातून पर्यटक येतात. पर्यटनासोबतच वैद्यकीय उपचारासाठी शहरात अधिक संख्येने परदेशी रुग्ण येण्यासाठी मेडिकल टुरिझमसाठी प्रयत्न हवे. त्यासाठी विमानसेवेत वाढ होणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.  शासनाच्या अनास्थेमुळे औरंगाबादेत मेडिकल टुरिझम वाढीसाठी फारसे प्रयत्न होत नाही. सध्या परदेशी रुग्णांना शहरात आकर्षित करण्यासाठी केवळ रुग्णालयांकडून प्रयत्न होत आहेत; परंतु विमानसेवेसह विविध सुविधा उपलब्ध करून दिल्यास वैद्यकीय क्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल,असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

विमानसेवा वाढावीवैद्यकीय क्षेत्राच्या दृष्टीने विमानसेवा वाढली पाहिजे. सोबतच शहरातील रस्त्यांचा आणि शहराचा विकास करण्याची गरज आहे. हा विकास झाला तरच मेडिकल टुरिझम वाढीला हातभार लागेल.-डॉ. कुलदीपसिंग राऊळ,अध्यक्ष, आयएमए

ठराविक वेळेचे गणितरुग्ण, डॉक्टर आणि अवयव यांच्या वाहतुकीच्या दृष्टीने विमानसेवेत वाढ झाली पाहिजे. हृदय, यकृतासारखे अवयव प्रत्यारोपण हे ठराविक वेळेच्या आत होणे गरजेचे असते. नोंदणी झालेल्या रुग्णाचे उपलब्ध अवयव गतीने हलविता आले पाहिजे.-डॉ. अजय रोटे, सीईओ, युनायटेड सिग्मा हॉस्पिटल

कनेक्टिव्हिटी महत्त्वाचीशहरात वैद्यकीय उपचाराचे दर मुंबई, पुण्याच्या तुलनेत कमी आहे. सध्या आखाती देशांतून उपचारासाठी येणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. मेडिकल टुरिझम वाढीसाठी हवाई कनेक्टिव्हिटी महत्त्वाची असून त्यात वाढ झाली पाहिजे.-डॉ. विकास देशमुख, अध्यक्ष, सर्जिकल सोसायटी 

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळMedicalवैद्यकीयairplaneविमानAurangabadऔरंगाबादCentral Governmentकेंद्र सरकार