शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

संपूर्ण नागरिकत्वाचा विडा उचलण्याची गरज : गणेश देवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 8:10 PM

येत्या काही काळात ‘सिटीझनशिप अमेंडमेंट बिल’ मांडले जाणार आहे.

ठळक मुद्दे‘सिटीझनशिप अमेंडमेंट बिल’ मधून ज्यू आणि मुस्लिम यांचा उल्लेख कटाक्षाने टाळला

औरंगाबाद : येत्या काही काळात ‘सिटीझनशिप अमेंडमेंट बिल’ मांडले जाणार आहे. यामध्ये पाकिस्तान, अफगणिस्तान आणि बांगलादेश या देशांतून भारतात येणाऱ्या ख्रिश्चन, हिंदू, बुद्धिस्ट, पारशी किंवा जैन नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याचा उल्लेख आहे; परंतु यामध्ये ज्यू आणि मुस्लिम यांचा उल्लेख कटाक्षाने टाळला गेला आहे. हे खूप गंभीर असून, ज्याप्रमाणे गांधीजी आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांनी संपूर्ण स्वातंत्र्याचा आग्रह केला होता, त्याचप्रमाणे आता आपण याविरुद्ध उठाव करून संपूर्ण नागरिकत्वाचा विडा उचलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी केले.

श्यामराव बोधनकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे डॉ. गणेश देवी यांना श्यामराव बोधनकर स्मृती पुरस्कार, तर कला संस्कृती वारसा अभ्यासक डॉ. दुलारी कुरेशी यांना इंद्रायणी बोधनकर पुरस्कार रविवारी सायंकाळी वसंतराव नाईक महाविद्यालयात आयोजित सोहळ्यात स्वातंत्र्यसैनिक ताराबाई लढ्ढा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी प्रा. राजाराम राठोड, स्वातंत्र्यसैनिक ना.वि. देशपांडे, राघवेंद्र चाकूरकर, डॉ. ऊर्मिला चाकूरकर व्यासपीठावर उपस्थित होते.सुरुवातीला अ‍ॅड. अभय राठोड, प्रवीण बोबडे यांनी स्फूर्तिगीत सादर केले. श्रीकांत उमरीकर यांनी संचालन केले. सुजाता जोशी-पाटोदेकर यांनी मानपत्राचे वाचन केले.

वडील आणि पतीच्या पाठिंब्याने घडलेलहानपणी वडील आम्हा बहिणींना घेऊन आवर्जून भारतभर विविध लेण्या पाहायला न्यायचे आणि त्याबाबतची सखोल माहिती द्यायचे. त्यांच्यामुळेच या लेण्या माझ्या डोक्यात भिनल्या आणि वडिलांनी याबाबतीत दाखविलेल्या सातत्यामुळेच मी घडत गेले. यानंतर पती रफत कुरेशी यांनीही माझ्या कामाला पाठिंबा दिला आणि माझे काम टिकून राहिले, असे डॉ. दुलारी कुरेशी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. डॉ. दुलारी यांनी औरंगाबादच्या इतिहासाविषयी सखोल माहिती देणारे एक पुस्तक लिहावे, असे ताराबाई यांनी सुचविले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGovernmentसरकारsocial workerसमाजसेवक