बीड : न्यायालयात दाखल होणाऱ्या प्रकरणांमध्ये बीडचे तहसीलदार अशोक नांदलगावकर निष्काळजी पणा करत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी एका पत्राद्वारे नांदलगावकर यांची कान उघडली केली आहे. एवढेच नाहीतर प्रलंबीत प्रकरणांची माहिती तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविली नाही तर शिस्त भंगाची कारवाई करण्याची तंबी देखील दिली आहे.बीड तहसील कार्यालय अंतर्गत साडेतीनशेवर गावांचा कारभार चालतो. विविध न्यायालयीन प्रकरण निकाली निघण्याच्या दृष्टीने तहसीलदार यांच्या स्तरावर दाखल होणाऱ्या प्रकरणात परिच्छेदनिहाय उत्तरे शपथपत्र व इतर आवश्यक कार्यवाही तहसीलदारांनी करणे अपेक्षित असते.मात्र, या बाबत बीडचे तहसीलदार अशोक नांदलगावकर यांनी कोणतेही काम वेळेवर केलेले नसल्याने न्यायालयाने वेळोवेळी प्रशासनावर ताशेरे ओढलेले ओहत. याला बीडचे तहसीलदार जबाबदार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या पत्रावरून समोर येते. (प्रतिनिधी)
न्यायालयीन प्रकरणात तहसीलदारांचा निष्काळजीपणा
By admin | Published: December 19, 2015 11:26 PM