लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापौर निवडणुकीमध्ये शिवसेनेशी चर्चा केल्यानंतरच मतदान करण्याची भूमिका घेण्याचा निर्णय भाजपने गुरुवारी जाहीर केला. दोन्ही पक्ष नेत्यांची बैठक घेऊन चर्चा करू, त्या चर्चेनंतर निर्णय घेऊ, येत्या दोन-तीन दिवसांत बैठक होईल, असे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी सांगितले.भाजप महापौर निवडणूक लढविणार आहे काय, या प्रश्नाचे उत्तर न देता त्यांनी पत्रकार परिषद गुंडाळली. महापौर नाही तर उपमहापौरपदावर भाजपचे कोण बसणार हे तरी सांगा, यावरही त्यांनी काहीही उत्तर दिले नाही.मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी सांगितल्याचे मला काहीही माहिती नाही. त्यांनी युती करण्यासाठी सांगितल्याची बातमी देखील मी कुठे वाचलेली नाही. शिवसेना उमेदवाराने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे, त्यावर खा.दानवे म्हणाले, शिवसेनेचा उमेदवार आणि खा.चंद्रकांत खैरे मला दोन दिवसांपूर्वी येऊन भेटले. त्याचप्रमाणे ते मुख्यमंत्र्यांनाही भेटले असतील; परंतु मला मुख्यमंत्र्यांचा अद्याप काहीही निरोप नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.शिवसेनेसोबत युती धर्म कायम ठेवायचा असेल तर काही अटी, वाटाघाटी करण्याचा विचार आहे काय. यावर ते म्हणाले, कुठल्याही अटी-शर्ती ठेवणार नाही. मित्रपक्ष म्हणून त्यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा तरी करावी लागेल ना, ती चर्चा औपचारिक असणार आहे. त्या चर्चेनंतर निर्णय जाहीर करण्यात येईल. ती बैठक केव्हा घेणार, यावर खा.दानवे म्हणाले, कधीही ती बैठक होईल, असे सांगून त्यांनी जाहीर केली नाही.
सेनेशी वाटाघाटी करु...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 12:41 AM