लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: महापालिका नगरसेवकांना मागील तीन वर्षांपासून ना स्वेच्छा निधीतून काम करता आले ना दलितवस्ती निधीतूऩ त्यामुळे १ सप्टेंबर रोजी होणाºया समारोपाच्या सभेत नगरसेवक नेमके कुणाचे आभार मानतील, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे़ विकासकामांचे आभार मानणे हा या विषय पत्रिकेवरील मुख्य विषय आहे, हेही विशेष़महापालिकेची सर्वसाधारण सभा १ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता महापालिका सभागृहात होणार आहे़ या सभेत मागील ५ सभेचे इतिवृत्त एकाचवेळी मान्यतेसाठी ठेवण्यात आले आहे़ इतिवृत्त हे पूर्वी झालेल्या सभेनंतर होणाºया सभेत ठेवून मंजूर करणे अपेक्षित आहे़ १४ आॅक्टोबर २०१६ पासूनच्या सभांचे इतिवृत्त मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे़ या इतिवृत्तांत सभेत न झालेल्या ठरावांवरही शुक्रवारी होणाºया महापालिकेच्या शेवटच्या सभेत वादळी चर्चा होण्याची अपेक्षा आहे़ आयत्या वेळचे विषय या नावाखाली अनेक नवीन ठरावही मंजुरीच्या यादीत टाकण्यात आल्याची माहिती काही नगरसेवकांना मिळाली आहे़ त्याचवेळी सभेच्या विषय पत्रिकेवरील दुसरा विषय हा नगरसेवकांच्या आभार प्रदर्शनाचा आहे़ विकासकामांसाठी नगरसेवकांनी केलेल्या कार्याबद्दल आभार व्यक्त केले जाणार आहे़ त्यामुळे आता अभ्यासू सदस्य झालेल्या विकासकामावर किती अन् न झालेल्या कामांवर किती आभार मानतील हे शुक्रवारीच स्पष्ट होणार आहे़सातत्याने दोन वर्षे दलितवस्ती निधी हा वादात अडकला आहे़ तब्बल ३० कोटींची कामे या वादात शहरात रखडली आहेत़ ही कामे दलित वस्तीतील असल्याने मूलभूत सोयी-सुविधांपासून शहरवासिय वंचित राहिले आहेत़ पहिल्या वर्षी तत्कालीन आयुक्त आणि महापौरांचे प्रतिनिधी यांच्या वैयक्तिक वादात तर दुसºया वर्षी राजकीय घडामोडीमुळे निधी अडकला आहे़दलितवस्ती निधीवरून आगामी महापालिका निवडणूक प्रचारात मोठे राजकारण होणार आहे़ राजकीय वादाचा हा मुद्दा झाला असला तरी दलित वस्तींचा विकास मात्र ठप्पच झाला आहे़ यावर आता सदस्य नेमकी काय भूमिका घेतील आणि या विषयात महापौर शैलजा स्वामी, महापालिका प्रशासन काय खुलासा करणार, हेही पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे़
ना स्वेच्छा ना दलितवस्ती निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:10 AM