छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात सर्वाधिक नद्यांचे जाळे असताना, स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांत नागरिकांना आठ दिवसांआड पाणी दिले जाते, असे का? असा प्रश्न उपस्थित करून भारत राष्ट्र समितीचा गुलाबी झेंडा राज्यात सत्तेवर आणा तेलंगणाप्रमाणे नळाला दररोज पाणी आणि मोफत वीज आम्ही देतो, असे आश्वासन भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी सोमवारी येथील जाहीर सभेत बोलताना दिले.बीआरएसतर्फे शहरातील जबिंदा मैदानावर आयोजित पहिल्याच जाहीर सभेत त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्राच्या पवित्र भूमीस प्रणाम करून, केसीआर यांनी आपल्या भाषणास प्रारंभ केला.
महाराष्ट्रापेक्षा खूप लहान व गरीब तेलंगणा राज्य शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज व शेतीला पाणी देते. एकरी दहा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करतो, दलितांच्या विकासासाठी दलित बंधू योजना राबवितो, तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महाराष्ट्र राज्याला का शक्य होत नाही, असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले, परंतु येथील राज्यकर्त्यांची हे देण्याची नियत नाही. महाराष्ट्रात धनाची नव्हे, कर मनाची कमी आहे. त्यामुळे आता वाघ व्हा. परिवर्तनाशिवाय काहीही मिळणार नाही. आगामी निवडणुकात जिल्हा परिषदेवर बीआरएसचा गुलाबी झेंडा फडकवा, महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे सरकार आणा, आम्ही एका झटक्यात येथील शेतकरी आत्महत्या थांबवू. तेलंगणात दिल्या, त्या योजना येथे सुरू करू. मंचावर लोह्याचे माजी आमदार शंकरअण्णा धोंगडे यांच्यासह तेलंगणातून आलेले खासदार पाटील, अनेक आमदारांसह शहरातील माजी आमदार अण्णासाहेब माने पाटील, हर्षवर्धन जाधव, संतोष पाटील, फिरोज पटेल, कदीर मौलाना आदींची उपस्थिती होती.
...तर खासगीकरणाचे धोरण बदलणार
n देशात जातिवाद, धर्मवाद, लिंगभेद वाढतो. धनवान जास्तच श्रीमंत होत आहे. गरीब अधिकच गरीब होत आहे. शेतकरी दररोज आत्महत्या करतो आहे.n नागरिकांना पिण्यास आजही पाणी मिळत नाही. ही गोष्ट नव्हे, तर देशातील हेच सत्य आहे.n हे असेच चालू ठेवायचे की बदलायचे आहे, असे सांगून केसीआर म्हणाले, आमच्या समस्या आम्हालाच सोडवाव्या लागतील. परदेशातून कुणी येणार नाही.
आता ‘किसान सरकार’
n तेलंगणातही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या. मी रडून आत्महत्या करणाऱ्यांना समजावून सांगत होतो. तेलंगणा मॉडेल लागू करा, मी महाराष्ट्रात येणार नाही, असे सांगितले. डिजिटल, मेक इन इंडिया जोक इन इंडिया झाला आहे. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांवर गुलाबी झेंडा फडकवा, असे आवाहन चंद्रशेखर यांनी केले.n नव्या संसद इमारतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या, अशी मागणी त्यांनी केली. स्वतःसाठी एकदा तरी मतदान करा. आपला जातधर्म शेतकरी बनायला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. त्यांनी सर्वांकडून ‘अब की बार किसान सरकार’चा नारा वदवून घेतला.
n विद्यमान राजवटीविरुद्ध शेतकरी, कामगार, बेरोजगार, दलितांनी लढ्यास सिद्ध व्हावे, असे आवाहन केले.n देशात सध्या खासगीकरणाचे वारे सुटले आहे. आम्ही सत्तेवर आल्यासखासगीकरणाचे धोरण बदलून पुन्हाराष्ट्रीयीकरणाचे धोरण आणू, पाणी धोरण बदलू, अशी घोषणाही त्यांनी केली.