शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

दोनशेच्या उंबरठ्यावर नवे कोरोनारुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 4:02 AM

औरंगाबाद : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी कोरोना रुग्णसंख्या दोनशेच्या उंबरठ्यावर राहिली. दिवसभरात १८६ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. ...

औरंगाबाद : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी कोरोना रुग्णसंख्या दोनशेच्या उंबरठ्यावर राहिली. दिवसभरात १८६ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ६९, तर ग्रामीण भागातील ११७ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील ९ रुग्णांचा मृत्यू झाला, तर अन्य जिल्ह्यातील ३ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या २ हजार ८७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४३ हजार २६० एवढी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ३७ हजार १४५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,२३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील २३७ आणि ग्रामीण भागातील १२१, अशा ३५८ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरु असताना शिवाजीनगर, कन्नड येथील ६२ वर्षीय महिला, काळा दरवाजा, किलेअर्क येथील ६५ वर्षीय महिला, न्यू श्रेयनगर, उस्मानपुरा येथील ४२ वर्षीय पुरुष, बजाजनगर येथील ५८ वर्षीय पुरुष, एकलहेरा, पिंप्रीराजा येथील ३८ वर्षीय पुरुष, रांजणगाव दांडगा, पैठण येथील ६२ वर्षीय पुरुष, संजयनगर येथील ४० वर्षीय पुरुष, वानखेडेनगर येथील ७२ वर्षीय पुरुष, शासकीय तंत्रनिकेतन, उस्मानपुरा येथील ६४ वर्षीय पुरुष आणि अहमदनगर जिल्ह्यातील ६६ वर्षीय महिला, ६८ वर्षीय महिला, बीड जिल्ह्यातील ६२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

सातारा परिसर २, बीड बायपास २, शिवाजीनगर ३, गारखेडा परिसर १, घाटी १, हमालवाडा १, सारा प्राईड सोसायटी, काल्डा कॉर्नर १, जालाननगर १, पहाडसिंगपुरा १, हर्सूल ३, महिंद्रा शोरुम २, बन्सीलालनगर १, सेंट्रल नाका रोड १, उस्मानपुरा १, भोईवाडा १, म्हाडा कॉलनी ३, देशमुखनगर १, जय भवानीनगर १, मुकुंदवाडी १, आंबेडकरनगर, बायजीपुरा १, एन-६ येथे १, एन-१२ येथे १, पडेगाव १, तारांगण १, एन-५ येथे १, ब्रीजवाडी २, एन-२ येथे १, एन-९ येथे २, एन-७ येथे १, देवळाई , साईनगर १, ज्ञानेश्वरनगर १, नक्षत्रवाडी १, हायकोर्ट कॉलनी १, वाल्मिकनगर १, नारळीबाग १, विमानतळ १, अंगुरी बाग २, पेठेनगर ३, बजरंग चौक १, अन्य १६

ग्रामीण भागातील रुग्ण

बजाजनगर ७, सिडको महानगर-१ येथे १, रांजणगाव १, पंढरपूर १, वाळूज २, वाळूज हॉस्पिटल ७, वडगाव कोल्हाटी १, पळशी १, विरमगाव १, वडगाव १, कडेठाण आडुळ १, पिशोर ता. कन्नड १, पैठण १, अटकल १, सिल्लोड १, मुलाणी वडगाव, ता. पैठण १, चिंचोली १, अन्य ८७