शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
2
डोनाल्ड ट्रम्पना आणखी एक मुलगी? पाकिस्तानातल्या तरुणीचा खळबळजनक दावा, Video व्हायरल
3
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
4
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन
6
IPL Auction 2025 : पाकिस्तानची वाट लावणारा IPL च्या लिलावात; अमेरिकेच्या दहा खेळाडूंनी केली नोंदणी
7
'ज्यांच्या घरावर बुलडोझर चालवला, त्यांना २५ लाख रुपये द्या'; सुप्रीम कोर्टाचे योगी सरकारला आदेश
8
"कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही"; राज ठाकरेंच्या टीकेवर अजितदादा म्हणाले, "कधी काय बोलतील..."
9
Priyanka Gandhi : "मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र
10
“राहुल गांधीची भूमिका संविधान बचाओ, फडणवीसांना शहरी नक्षलवाद का वाटतो?”; काँग्रेसचा सवाल
11
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
12
'बविआ'समोर भाजपचे आव्हान! जागा शिंदेंच्या पण उमेदवार भाजपचे
13
"काहीही झालं तरी जातनिहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणारच"
14
"मी त्यांना नोटीस पाठवतो"; रामराजेंबाबत अजित पवारांना घेतली कठोर भूमिका, कारण...
15
'तो' एक फॉर्म्युला लागू झाल्यास परळीत धनंजय मुंडेंची होणार अडचण; नेमकं राजकारण काय?
16
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
17
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
18
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
19
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
20
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी

राजकारणात नवीन आयडिया सोशल मीडिया

By admin | Published: August 03, 2014 12:57 AM

औरंगाबाद : वेगवेगळ्या क्षेत्रांत विज्ञानाने क्रांती घडवून आणली. राजकीय क्षेत्रही यापासून अलिप्त राहू शकत नाही.

औरंगाबाद : वेगवेगळ्या क्षेत्रांत विज्ञानाने क्रांती घडवून आणली. राजकीय क्षेत्रही यापासून अलिप्त राहू शकत नाही. वेबसाईटपेक्षा पुढे जाऊन राजकीय मंडळींनी फेसबुक आणि व्हॉटस्अपचा जोरदार वापर सुरू केला आहे. सोशल साईटचा वापर ही एक आत्मसमाधानाची बाब असून, याचा वापर करणारे १४.८ टक्के नागरिक आहेत.देशात मोबाईल ग्राहक झपाट्याने इंटरनेटकडे वळत आहेत. एका सर्वेक्षणानुसार देशात पन्नास टक्क्यांहून अधिक मोबाईल ग्राहक इंटरनेटचा वापर करतात. आपल्या मोबाईलच्या बिलातील सुमारे ४५ टक्के रक्कम ते इंटरनेटच्या वापरावर खर्च करतात. याचा थेट लाभ सामाजिक आणि व्यावसायिकांनंतर राजकीय मंडळीही करीत आहे. शहरात शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनीही आपली वेबसाईट फार पूर्वीच सुरू केली. राजेंद्र दर्डा फेसबुक आणि व्हॉटस्अपवरही वैयक्तिकरीत्या वेळ देतात. त्याचप्रमाणे कॅबिनेटमंत्री अब्दुल सत्तार, खा. चंद्रकांत खैरे हेसुद्धा फेसबुकवर सक्रिय आहेत. आमदारांमध्ये सतीश चव्हाण, संजय शिरसाट, जालन्याचे कैलास गोरंट्याल फेसबुकवर सक्रिय आहेत.राजकीय मंडळीही आता सोशल साईटस्ला एक आवश्यक तंत्र समजत आहेत. त्यासाठी लागणाऱ्या आवश्यकताही ते पूर्ण करीत आहेत. या कार्यामुळेच राजकीय मंडळी आपल्या टीमसोबत वाटचाल करीत आहे. तांत्रिकरीत्या सक्षम असलेले काही नेते आपले काम स्वत: करीत आहेत. काही जण असेही आहेत की, छंद आणि एकमेकांचे पाहून एकदा कार्याला सुरुवात करतात आणि नंतर नवीन परिवर्तन विसरून जातात. त्यामुळे सोशल नेटवर्किंगमध्ये त्यांची लोकप्रियता राहत नाही. सर्वसामान्यपणे सोशल नेटवर्किंगवर राजकीय नेत्यांच्या दैनंदिन उपक्रमाला प्राधान्यता देण्यात येत आहे. काही ठिकाणी तर संवादही ठेवण्यात येत आहे. व्हॉटस्अप सूचना पोहोचवण्यासाठी मोठे साधन ठरत आहे. कोणतीही सूचना कमी वेळेत जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवता येते.शहरी भागात सोशल नेटवर्किंगची मोठी क्रेझ असली तरी ग्रामीण भागात बऱ्याच मर्यादा आहेत. अनेक दुर्गम भागांमध्ये इंटरनेटची चांगली सेवा मिळत नसल्याने मोबाईल ग्राहक या सेवेपासून वंचित आहेत. इंटरनेटमुळे मोबाईल कंपन्यांना चांगले दिवस प्राप्त झाले आहेत. त्यांना आपले जाळे असून पाहिजे तेवढे पसरविता आले नाही. देशात मोबाईलवर इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या १४.८ एवढीच आहे. नवी दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद आदी मोठ्या शहरांमध्ये मोबाईलचा वापर करणारे ३९.५ टक्के नागरिक आहेत. ग्रामीण भागात फक्त ३.७ टक्के नागरिक आहेत. ही परिस्थिती सर्व प्रयत्नांना खीळ घालणारी आहे. देशात मोबाईलवर इंटरनेट वापरणारे एकूण मोबाईल इंटरनेट यूजर्स- १४.८ टक्केशहरी मोबाईल इंटरनेट यूजर्स- ३९.५ टक्के(नवी दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद आदी शहरे)ग्रामीण मोबाईल इंटरनेट युजर्स- ३.७ टक्केसर्वाधिक उपयोग- फेसबुक, व्हॉटस् अप आणि यू ट्यूब