शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

फसवणुकीचा नवा फंडा! जुन्या एक रुपयाच्या नाण्यासाठी सात लाख रुपये देतो

By प्रशांत तेलवाडकर | Published: November 08, 2022 4:22 PM

सोशल मीडियाचा गैरफायदा घेत जुन्या नाण्यांच्या खरेदीचे आमिष देऊन फसवेगिरी होत आहे

औरंगाबाद : तुमच्याकडे १९७८ सालचे १ रुपयाचे नाणे आहे का? ज्यात खाली टिंब असायला हवे, तर तुम्हाला मिळू शकते. ६ लाख ७० हजार ५२० रुपये... हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल; पण अशा प्रकारचे स्पॅम व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण या मोहात पडून तुम्ही आपल्याकडील नाणी कुरिअरने पाठवू नका... तुमच्याकडील जी नाणी आहेत, ती गमावून बसाल.

फसवणुकीचा नवा फंडाकाही महिन्यांपासून सोशल मीडियावर स्पॅम व्हिडिओ व्हायरल होत आहे. ‘एक रुपयाचे एक दुर्मीळ नाणे १० कोटींना विकले गेले. तुम्हीही लाखो रुपये कमवू शकता किंवा १९८८ यावर्षी चलनात आलेले व त्यावर गेंड्याचे चित्र असलेले नाणे दाखविले जाते व तुमच्याकडे असे नाणे असेल तर पाठवा, तुम्हाला १७ लाख रु. मिळतील. असे दाखविले जाते. मोबाईल नंबरही दिला जातो. अनेक लोक आपल्याकडील अशी नाणी कुरिअरने पाठवत आहेत. मात्र, काहीच उत्तर येत नाही.

दुर्मीळ नाणी शोधण्यासाठी रविवारच्या बाजारात गर्दी१९७७-१९८४ या वर्षात चलनात आलेली व ज्यावर इंदिरा गांधी यांचा छापा असलेली नाणी असो वा १९८९ मध्ये चलनात आलेली जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी असे लिहिलेली नाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही नाणी पाठविली तर लाखो रुपये मिळतात. या मोहापायी मोंढ्यातील रविवारच्या आठवडी बाजारात अनेकजण गेले... तिथे जुनी नाणी विक्रेत्याच्या भोवती गराडा होता. ढिगातून एक-एक नाणे शोधले गेले. शहरात फाटक्या नोटा खरेदी करणे किंवा जुन्या नाण्यांचा संग्रह करणाऱ्याकडेही हे लोक जाऊन जुनी नाणी आहे का, याचा शोध घेत आहेत.

आम्ही फसलो, तुम्ही फसू नकामाझ्याकडे घोड्याचा छापा असलेला लाल रंगातील एक पैसा माझ्या पाहण्यात आला. मी सोशल मीडियावर हा संग्रहाचा फोटो टाकला. मला थोड्या वेळातच फोन आला, तुम्हाला या एक पैशाचे एक हजार रुपये मिळतील. एका जणाकडे पाच नाणी मिळाली. मी त्यास एका नाण्यासाठी ५०० रुपये दिले. अडीच हजार रुपये मोजले. दिलेल्या पत्त्यावर पाट५ नाणी पाठविली. दोन आठवडे झाले पण अजून निरोप नाही. मोबाईल नंबर बंद येत आहे. मी फसलो, तुम्ही फसू नका.- विजय सोनवणे, फसविले गेलेले नागरिक

मी तर ५० कोटींचा मालक झालो असतोमाझ्याकडे अनेक वर्षांपासूनच्या जुनी, दुर्मीळ नाण्यांचा संग्रह आहे. असे जर हजारो, लाखो रुपये जण या नाण्यांना मिळाले असते तर मी ५० कोटींपेक्षा अधिक रकमेचा मालक झालो असतो. मी लोकांना आवाहन करतो की, दुर्मीळ नाण्यांला लाखो रुपये मिळतात, ही सर्व फसवेगिरी आहे. कोणीही फसू नका.- सुधीर कोर्टीकर, जुन्या नाण्यांचे संग्राहक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादbankबँकCrime Newsगुन्हेगारी