शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘स्लॉट’ मिळताच औरंगाबादसाठी नव्या विमानसेवेचे ‘टेक ऑफ ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 5:17 PM

मुंबई, दिल्ली विमानतळांकडून उड्डाणाची वेळ हवी

ठळक मुद्देऔरंगाबादसाठी विमाने राखीव

औरंगाबाद : औरंगाबादहून नव्या विमानसेवा सुरू करण्यासाठी विमान कंपन्या तयार आहेत. मात्र, दिल्ली आणि मुंबई विमानतळाकडून स्लॉट (विमान उड्डाणासाठी वेळ) मिळाल्यानंतरच विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती मंगळवारी (दि.३०) दिल्लीत टूर आॅपरेटर, उद्योजक आणि व्यावसायिकांच्या विमान कंपन्यांसोबत झालेल्या बैठकीतून समोर आली. त्यामुळे स्लॉट कधी मिळतो याकडे लक्ष लागले असून, त्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. 

औरंगाबादमध्ये देशांतर्गत पर्यटन, उद्योग आणि व्यवसाय वाढीसाठी विमानांची संख्या वाढवून राजस्थान, दिल्ली आणि मुंबईची एअर कनेक्टिव्हिटी बळकट करण्याच्या मागणीसाठी टूर आॅपरेटर, उद्योजक आणि व्यावसायिकांचे शिष्टमंडळ दिल्लीमध्ये आहे. या शिष्टमंडळात उद्योजक सुनीत कोठारी यांच्यासह कॉक्स अँड  किंग कंपनीचे सरव्यवस्थापक तरुण खुल्लर, इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटरचे अध्यक्ष प्रणव सरकार, उपाध्यक्ष राजीव मेहरा आणि औरंगाबाद टुरिजम डेव्हलपमेंट फोरमचे अध्यक्ष जसवंत सिंह राजपूत यांचा सहभाग होता. 

या शिष्टमंडळाची एअर इंडियासह तीन विमान कंपन्यांसोबत सलग तिसरी बैठक पार पडली. याबाबत अधिक माहिती देताना शिष्टमंडळाचे नेतृत्व करीत असलेले सुनीत कोठारी म्हणाले, औरंगाबादहून राजस्थान, दिल्ली आणि मुंबई विमान कनेक्टिव्हिटी वाढविण्यासंदर्भात मागील तीन महिन्यांपासून विमान कंपन्यांकडे पाठपुरावा करीत आहोत. याच संदर्भात दिल्लीत मंगळवारी तीन विमान कंपन्यांसोबत बैठक झाली. यादरम्यान विमानसेवा सुरू करण्यासाठी येणाऱ्या अडचणी आणि त्या कशाप्रकारे सोडविता येतील, यावर सखोल चर्चा झाली. औरंगाबादेतून विमानसेवा सुरू करण्यासाठी येणाऱ्या बहुतांश अडचणी आता दूर झाल्या असल्या तरीही दिल्ली आणि मुंबईच्या विमानतळ कंपन्यांकडून अद्याप स्लॉट मिळालेला नाही. त्यासाठी यापुढे प्रयत्न केले जाणार आहेत.

औरंगाबादचा समावेश बुद्धिस्ट सर्किटमध्ये करापरदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रवासात सूट मिळत असलेली डिस्कव्हर इंडिया फेअर ही योजना पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी ही योजना नक्कीच फायद्याची ठरू शकेल. १५ ते २१ दिवसांसाठी ही योजना सुरू करण्याचा विचार केला जाईल. ही योजना पुन्हा सुरू झाल्यास आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येत नक्कीच वाढ होईल. औरंगाबादचा समावेश बुद्धिस्ट सर्किटमध्ये करण्यात यावा, अशीही मागणी शिष्टमंडळाने लावून धरली आहे. 

पाठपुरावा सुरू विमान कंपन्यांनी औरंगाबादसाठी विमान राखीव ठेवलेले आहे. हा स्लॉट मिळाल्यानंतर लगेचच विमानसेवा सुरू करता येणार आहे. त्यासाठी विमान कंपन्या, पर्यटन उद्योगातील व्यावसायिक आणि लोकप्रतिनिधी सातत्याने पाठपुरावा करीत असून, लवकरात लवकर औरंगाबाद राजस्थान, दिल्ली आणि मुंबईशी जोडले जाईल.- सुनीत कोठारी, उद्योजक

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळairplaneविमानAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन