शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

श्रावणात न्यू ट्रेंड! महादेवाच्या टॅट्यूमध्ये सजीवपणा आणण्यात ‘एआय’चा हात

By प्रशांत तेलवाडकर | Published: August 14, 2024 4:29 PM

महादेव आपल्यासोबत राहावा यासाठी तरुण भक्तांमध्ये दंडावर, मनगटावर, पाठीवर, छातीवर एवढेच नव्हे तर आता मानेवरही टॅट्यू काढून घेतले जात आहे.

छत्रपती संभाजीनगर : कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स)चा वापर आता सर्व क्षेत्रांत होऊ लागला आहे. एवढेच नव्हे तर महादेवाचे टॅट्यू बनविण्यातही ‘एआय’चा वापर होताना दिसत आहे. होय, महादेव, त्रिशूल आपल्या सोबत राहावे, यासाठी तरुणाई टॅट्यू काढून घेत आहे. इतरांपेक्षा आपले टॅट्यू ‘जरा हटके’ दिसावे, यासाठी चक्क ‘एआय’चा वापर करून नवीन डिझाइन बनविले जात आहे. याशिवाय संस्कृतमधील काही श्लोक किंवा त्याच्या ओळी हातावर गोंदवून घेण्याकडे कल वाढला आहे.

श्रावण महिना सुरू असून मागील काही वर्षांत महादेव भक्तांची संख्या वाढली आहे. यात तरुणाईची संख्या अधिक आहे. महादेव आपल्यासोबत राहावा. यासाठी दंडावर, मनगटावर, पाठीवर, छातीवर एवढेच नव्हे तर आता मानेवरही टॅट्यू काढून घेतले जात आहे.

काय बदल घडला

पूर्वी आम्ही पारंपरिक पद्धतीने टॅट्यू काढत होतो; पण आता ‘एआय’मुळे नवनवीन डिझाइन मिळू लागल्या आहेत. आधी आम्ही फोटोशॉपचा वापर करत आता ‘एआय’ची मदत होत आहे. यात महादेव, त्रिशूल, डमरू, सोबत संस्कृती श्लोकही नावीन्यपूर्ण आकर्षक शैलीत आम्हाला मिळत आहे. हे टॅट्यूला तरुणाईमध्ये प्रिय झाले आहेत. सध्या महादेवाचे पोर्ट्रेट बोस्ड टॅटू ट्रेंडमध्ये आहे. त्यांचा आकार १५ ते २० इंचांपर्यंत असतो. टॅट्यूचे डिझाइन शोधण्यासाठी ‘एआय’चे सोशल मीडियावर अनेक ॲप उपलब्ध झाले आहे. आता तर व्हॉटस्ॲपवरही ‘एआय’ अवतरले आहे. याचाच फायदा टॅट्यू आर्टिस्ट घेत यात नावीन्यता आणत आहेत.- सीमा कस्तुरे, टॅटू आर्टिस्ट

अमेरिकेन शाईचा वापरटॅट्यूमध्ये दोन प्रकार आहेत. एक कायमस्वरूपी व दुसऱ्या तात्पुरता टॅट्यू असतो. यासाठी खास अमेरिकेच्या शाई (इंक)चा वापर केला जातो. ही शाई त्वचेसाठी नुकसानदायक नसते.

१) ५०० ते १ लाख रुपयांपर्यंत आकारानुसार टॅट्यूची किंमत२) शहरात १५० पेक्षा अधिक टॅट्यूची दुकान३) १ इंचांपासून ते २० इंचांपर्यंतचे टॅट्यू काढले जाते.४) टॅट्यू काढण्यासाठी आकारानुसार अर्धा तास ते ६ तासांपर्यंत लागतो वेळ. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShravan Specialश्रावण स्पेशल