शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

औरंगाबादसाठी १,६८० कोटींची नवी पाणीपुरवठा योजना मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 2:25 PM

योजनेच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी होताच सेना-भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राज्यमंत्री अतुल सवे यांनी केली घोषणा 

ठळक मुद्दे जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंत २,४५० मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी शहरात २,१०० कि.मी.च्या अंतर्गत जलवाहिन्या पुढील पंधरा वर्षांत शहराला ६०४ एमएलडी पाणी मिळेल. ही योजना दोन टप्प्यांत पूर्ण केली जाईल.

औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहराचा पाणी प्रश्न अवघ्या ५५ दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडविला. शहरासाठी नवीन १,६८० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना आज मंजूर केली. या योजनेच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी करताच सायंकाळी उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांनी सेना-भाजप पदाधिकाऱ्यांसोबत एका भरगच्च पत्रकार परिषदेत नवीन पाणीपुरवठा योजनेची घोषणा केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अवघ्या पाचच दिवसांत निविदा प्रसिद्ध करणार आहे. तीन वर्षांमध्ये योजना पूर्ण होईल. योजनेला शंभर टक्केशासन अनुदान असल्याचेही जाहीर करण्यात आले.

समांतर जलवाहिनीचा प्रकल्प रद्द केल्यानंतर आजही सर्वोच्च न्यायालयात मनपाविरुद्ध कंपनी, असा वाद सुरू आहे. पाण्याअभावी शहरातील लाखो नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवा, अशी मागणी अतुल सावे यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती. मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांना वैयक्तिक लक्ष घालून ही योजना पूर्ण करावी, अशी सूचना दिली. अवघ्या ५५ दिवसांमध्ये विविध अडथळ्यांची शर्यत पार करीत फाईल सोमवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचली. आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी त्यावर स्वाक्षरी केल्याचे सावे यांनी नमूद केले.

२०५०-५२ पर्यंत औरंगाबादसह आसपासच्या खेड्यांची लोकसंख्या किमान ३५ ते ४० लाख होणार आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी योजनेचे डिझाईन तयार करण्यात आले आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेत जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंत २,४५० मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकणे, शहरात २,१०० कि.मी.च्या अंतर्गत जलवाहिन्या टाकणे, नक्षत्रवाडी येथे नवीन एमबीआर बनविणे, जलशुद्धीकरण केंद्र उभारणे आदी कामांचा समावेश आहे. ही योजना दोन टप्प्यांत पूर्ण केली जाईल. पहिला टप्पा पंधरा वर्षांचा राहील. या टप्प्यात शहराला ४५१ एमएलडी पाणी मिळेल. त्यानंतर पुढील पंधरा वर्षांत शहराला ६०४ एमएलडी पाणी मिळेल. नवीन पाणीपुरवठा योजनेत सातारा, देवळाईसह महापालिका हद्दीतील सर्व भागांचा समावेश करण्यात आला आहे. सद्य:स्थितीत पालिका हद्दीचे क्षेत्रफळ १७६ वर्ग कि.मी. एवढे आहे. या सर्व भागात एकूण २,१०० कि.मी.च्या अंतर्गत जलवाहिन्या टाकण्यात येतील. नवीन पाणीपुरवठा योजनेत सर्वाधिक खर्च ५३३ कोटी रुपये मुख्य जलवाहिनीसाठी, २७३ कोटीअंतर्गत जलवाहिन्यांसाठी आणि २५४ कोटी शुद्धीकरण केंद्र व तेथून पुढे जलकुंभापर्यंत जलवाहिन्यांसाठी लागणार आहेत.

मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी यावेळी नमूद केले की, नक्षत्रवाडीत मोठे एमीबीआर तयार करण्यात येईल. तेथून एकूण ५ जलवाहिन्या शहरात येतील. सध्या शहरात २७ जुन्या टाक्या आहेत. नवीन ५२ टाक्या तयार करण्यात येतील. पत्रकार परिषदेला उपमहापौर विजय औताडे, सभापती जयश्री कुलकर्णी, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, सभागृहनेता विकास जैन, माजी महापौर बापू घडमोडे, गजानन बारवाल, शिरीष बोराळकर, अनिल मकरिये, नगरसेवक दिलीप थोरात, प्रमोद राठोड, मकरंद कुलकर्णी, शिवाजी दांडगे आदींची उपस्थिती होती. 

उद्धव ठाकरेंनी साकडे घातले म्हणून१७ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीनिमित्त औरंगाबादेत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर होते. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शहराचा पाणी प्रश्न सोडवा म्हणून मुख्यमंत्र्यांना साकडे घातले होते. त्यांच्यामुळेच ही योजना मार्गी लागल्याचा दावा आज पत्रकार परिषदेत महापौर नंदकुमार घोडेले यांनी केला.

नवीन पाणीपुरवठा योजनेचे स्वरूप१,६८० कोटी योजनेचा संपूर्ण खर्च. ५३३  कोटी मुख्य जलवाहिनीसाठी.

२,४५०  मि.मी.व्यासाची मुख्य जलवाहिनी.२७३  कोटीअंतर्गत जलवाहिन्यांसाठी.

२७   टाक्या जुन्या वापरणार२५   नवीन टाक्या बांधणार.

६६० मीटर उंचीवर नक्षत्रवाडीत नवा एमबीआर.७००  किलोमीटरच्या नव्या अंतर्गत जलवाहिन्या.

०८ कोटी दरमहा विजेचा खर्च येणार.२०५० इ.स. डोळ्यासमोर ठेवून योजनेचे डिझाईन.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाParallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबादState Governmentराज्य सरकारAtul Saaveअतुल सावे