शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
11
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

सासू , नणंदेचे टोमणे जिव्हारी लागल्याने नवविवाहिता जीव देण्यास गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 17:09 IST

newlyweds girl trying to suicide सासू, नणंदेच्या छळामुळे आत्महत्येसाठी तलावावर आलेल्या नवविवाहितेला दामिनी पथकाने वाचविले

ठळक मुद्देसासू आणि अविवाहित नणंद किरकोळ कारणावरून तिला टोमणे मारतात.दुय्यम वागणूक मिळत असल्यामुळे ती खिन्न झाली.

औरंगाबाद : सासू आणि नणंद चांगली वागणूक देत नसल्याने नैराश्य आल्यामुळे आत्महत्येचा विचार करीत हर्सूल तलावावर फिरणाऱ्या नवविवाहितेला वाचविण्यात दामिनी पथकाला मंगळवारी दुपारी यश आले.

ग्रामीण भागातील रहिवासी असलेली तरुणी स्वाती (नाव बदलले) दोन महिन्यांपूर्वी लग्न झाल्यामुळे ती सासरी नांदावयाला आली. तिचा पती कामावर जातो. तो अत्यंत प्रेमळ आहे. मात्र, तिची सासू आणि अविवाहित नणंद किरकोळ कारणावरून तिला टोमणे मारतात. दुय्यम वागणूक मिळत असल्यामुळे ती खिन्न झाली. आज पहाटे पाच वाजता ती घरातून बाहेर पडली आणि चालत चालत हर्सूल तलावावर आली. ती तलावावर घुटमळत असल्याचे पाहून परिसरातील एका जागरूक महिलेने ही बाब दामिनी पथकाला कळविली. सकाळी साडेदहा वाजता पथकाने तिला गाठले. सुरुवातीला सुमारे तासभर ती बोलतच नव्हती. तिला विश्वासात घेतल्यावर तिने हकीकत सांगितली. घरी परत जायचे नाही आणि माहेरीही जाणार नाही, असे ती म्हणत होती. बोलताना तिने तिचा पती चांगला असल्याचे सांगितले.

समुपदेशनानंतर सोडले घरी नेऊनदामिनीच्या उपनिरीक्षक स्नेहा करेवाड यांनी तिला हर्सूल पोलीस ठाण्यात नेऊन तिचे समुपदेशन केले तेव्हा तिने आपण सासरच्या जाचाला कंटाळून नव्हे तर आपले माहेर हे लांब आहे. पती चांगला असल्यामुळे आत्महत्येचा निर्णय डोक्यातून काढत असल्याचे तिने मान्य केले. यानंतर तिच्या सासरचा शोध घेऊन तिला सासरच्या मंडळीकडे सुपुर्द करण्यात आले. ही कारवाई महिला अंमलदार लता जाधव, आशा गायकवाड, साक्षी संगमवाड यांनी केली़

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी