शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

सुसाट वाहनाने उडविलेल्या वृत्तपत्र विक्रेत्याची मृत्यूशी झुंज थांबली, मुजोर चालक अद्यापही पसार

By सुमित डोळे | Published: June 20, 2024 6:40 PM

अतिवेगाचा आणखी एक बळी, अपघाताच्या पाच दिवसांनंतर मुजोर चालक अद्यापही पसार

छत्रपती संभाजीनगर : शहरातील जालना रोडवर वाहनांच्या अतिवेगाचा आणखी एक बळी गेला आहे. शनिवारी पहाटे सुसाट चारचाकीने उडविलेले वृत्तपत्र विक्रेते प्रशांत श्रीराम थोरात (५५, रा.राजाबाजार) यांची पाच दिवसांनी अखेर मृत्यूशी झुंज संपली. बुधवारी सकाळी त्यांचा रुग्णालयात उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला.

जालना रोडवर आता दिवसासह रात्रीही वाहने सुसाट दामटली जातात. वाहनांची संख्या वाढलेली असताना रस्ता मात्र अरुंद झाला, परंतु त्या तुलनेत सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका, पोलिसांकडून आवश्यक उपाययाेजना करण्यात आल्या नाहीत. परिणामी, सातत्याने अपघाती मृत्यूंची संख्या वाढत गेली. आठवड्याभरापूर्वी विद्यार्थी व वृद्धेच्या मृत्यूने संताप व्यक्त होत होता. त्यातच १५ जून रोजी पहाटे ४:३० वाजता थोरात मोंढा नाका उड्डाणपुलाखालून आकाशवाणीच्या दिशेने जात हाेते. याच वेळी पुलावरून सुसाट आलेल्या फिकट काळ्या रंगाच्या (एम एच २० एफडब्ल्यु - ९००७) कारने त्यांना धडक देऊन पोबारा केला. यात थोरात लांब फेकले गेले. डोके, छातीला गंभीर जखम झाली. तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी सकाळी मात्र थोरात यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर कैलासनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात आई, पत्नी शिल्पा, मुले विराज, सुजल, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे.

मुजाेर चालक पसारधडकेनंतर थोरात लांब फेकले जाऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. मात्र, मुजाेर कार चालकाने त्यांना गंभीर अवस्थेत सोडून पोबारा केला. जिन्सी पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकाला कुठल्याही परिस्थिती अटक होईल. सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक तपास करून चालक निश्चित करून लवकरच अटक करू, असे जिन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघात