शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

जायकवाडी धरणावरील तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधातील याचिका ‘एनजीटी’ने फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 8:24 PM

सदर प्रकल्पाच्या विरोधात कहार समाज पंच समितीने पर्यावरणहित याचिका (ईआयएल) दाखल केली होती.

छत्रपती संभाजीनगर : पक्षी अभयारण्य आणि ‘इको-सेन्सिटिव्ह झोन’ म्हणून घोषित केलेल्या जायकवाडी धरणावरील तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधातील याचिका राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे न्यायिक सदस्य न्या. दिनेशकुमार सिंह आणि तज्ज्ञ सदस्य विजय कुलकर्णी यांनी फेटाळली.

अशा प्रकारचा प्रकल्प पर्यावरणीय संवेदनशील भागात नसावा याविषयी काही कायदेशीर तरतूद आहेत काय याविषयीचे पुरावे याचिकाकर्त्यांना सादर करता आले नाहीत, म्हणून न्यायाधिकरणाने याचिका फेटाळली. सदर प्रकल्पाच्या विरोधात कहार समाज पंच समितीने पर्यावरणहित याचिका (ईआयएल) दाखल केली होती.

टिहरी हायड्रो कंपनी ही राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाच्या (एनटीपीसी) मालकीची आहे. महाराष्ट्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने जायकवाडी धरणावर तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या स्थापनेसाठी निविदा जारी केली आहे. तरंगणारा सौर ऊर्जा प्रकल्प जलचरांसाठी हानिकारक ठरेल आणि संरक्षित पक्षी अभयारण्यातील जैवविविधतेला कायमचे नुकसान पोहोचेल, अशी माहिती यापूर्वी याचिकाकर्त्याच्या वतीने सादर करण्यात आली होती. धरणातील पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी पुरवले जाते. सौर पॅनेलने झाकल्याने पाणी दूषित होईल, असा मुद्दाही मांडण्यात आला होता. या याचिकेवर ९ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत महाराष्ट्राचे प्रधान मुख्य वनसंरक्षक मत्स्यव्यवसाय मंत्रालय यांनी न्यायालयाच्या पूर्वीच्या आदेशानुसार अहवाल सादर केला. संरक्षित अभयारण्यात प्रकल्प उभारण्यास परवानगी असल्याचे त्यांनी नमूद केले. तर केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, पर्यावरण आणि वन विभागाने संबंधित कायद्याची प्रत सादर केली.

ही प्रमोटेड ॲक्टिव्हिटीही ‘प्रमोटेड ॲक्टिव्हीटी’ असून बायोगॅस, सौर ऊर्जा निर्मितीचा त्यात समावेश असल्याचे सांगितले. याचिकाकर्त्याच्या वतीने पुन्हा पर्यावरणीय मुद्दे मांडण्यात आले. तसेच पर्यावरण मंत्रालयाचे लेखी उत्तर नसल्यामुळे हा एनजीटीचा अवमान असल्याचे त्यांनी म्हटले. अभयारण्यात तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पास प्रतिबंध असल्याची कायदेशीर तरतूद आहे का, अशी विचारणा न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या वकिलांना केली. असा कोणताही कायदा नसल्याचे त्यांनी सांगितले. सुनावणीअंती न्यायाधिकरणाने याचिका फेटाळली.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणelectricityवीजCourtन्यायालयAurangabadऔरंगाबाद