लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ओव्हरटेक करणाऱ्या दुचाकीचालकाला वाचविताना पाण्याच्या खाजगी टँकरने समोरून येणाºया आॅटो रिक्षाला धडक दिल्यानंतर टँकरने रिक्षाला ५० फूट फरपटत नेले. या भीषण अपघातात रिक्षाचालकासह ९ प्रवासी टँकर आणि रिक्षाखाली चिरडून घटनास्थळीच ठार झाले. पैठण रोडवरील गेवराई तांडा येथे एका ढाब्याजवळ शुक्रवारी सायंकाळीसहाच्या सुमारास हा अपघात घडला. यानंतर प्रत्यक्षदर्शी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना घाटीत दाखल केले.जनार्दन नाथा अवचरमल (४८, रा. साईनगर, चितेगाव), त्यांची नात अनुजा सुनील अवचरमल (११), राममहेश प्यारेलाल ठाकूर (३७, रा. बिडकीन), त्यांची आई रामकुमारी प्यारेलाल ठाकूर (६०, रा.बिडकीन), भावजय पुष्पा धर्मेंद्र ठाकूर (३५, रा. बिडकीन) व पुतण्या युवराज धर्मेंद्र ठाकूर (३), शिवलालसिंग गुलाबसिंग ठाकूर (८४, रा. मातोश्री वृद्धाश्रम, कांचनवाडी), शेकू तुकाराम त्रिंबके (७५, रा. मातोश्री वृद्धाश्रम), रिक्षाचालक अमीर मतुर शेख (२३, रा. नूर कॉलनी, जुना बाजार) अशी मृतांची नावे आहेत.
रिक्षाचालक अमीर हा त्याच्या रिक्षात (एमएच-२० डीसी ४२६७) आठ प्रवाशांना घेऊन बिडकीनकडे जात होता. त्याचवेळी बिडकीनकडून पाण्याचे खाजगी टँकर (क्रमांक एमएच-१५जी ८४०) नक्षत्रवाडीकडे येत होते. गेवराई तांडा येथील एका ढाब्याजवळ बिडकीनकडून आलेला एक सुसाट दुचाकीस्वार औरंगाबादकडे जाण्यासाठी टँकरला ओव्हरटेक करण्यासाठी पुढे आला. डाव्या बाजूने अचानक समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी टँकरचालकाने वेगातील टँकर उजव्या बाजूच्या रस्त्यावर घेतले. त्याचवेळी समोरून अमीर रिक्षा घेऊन येत होता. उजव्या लेनवर आलेला त्यांच्यासाठी रस्ता सोडेल अथवा ब्रेक लावून त्यांना मार्ग देईल असे त्यांना वाटल्याने तो टँकरच्या दिशेने आला, मात्र टँकरचालकाने ब्रेक न लावता त्यांना जोराची धडक दिली. यावेळी टँकरने रिक्षाला सुमारे पन्नास फुटापर्यंत फरपटत नेले. हा अपघात एवढा भीषण होता की, रिक्षातील प्रवासी खाली पडून टँकरखाली चिरडले गेले.शर्थीच्या प्रयत्नांनंतरही अपयशच्अपघाताचे साक्षीदार असलेले घाटी रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीतील कर्मचारी हनुमान रूळे आणि त्यांच्या मित्रांनी पाच जखमींना दोन रिक्षांतून घाटीत नेले, मात्र दुर्दैैवाने जखमींनी रस्त्यातच प्राण सोडल्याने रुळे यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.च्अपघाताचे भीषण दृश्य पाहून प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांनी मदतकार्य सुरू केले. अरूंद रस्ता असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे बराच वेळ वाहतूक कोंडी झाली.