लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकरी बियाणे,रासायनिक खतांची जुळवाजुळव करत आहे.पेरणीच्या तोंडावर बियाणे तसेच खतांचा काळा बाजार होऊ नये म्हणून कृषी विभागाच्या वतीने जिल्हास्तरावर एक व प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक या प्रमाणे नऊ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके वेळेत तसेच दर्जेदार मिळावीत म्हणून या पथकांची स्थापना करण्यात आली आहे. भरारी पथक शेतकऱ्यांच्या तक्रारी तसेच अचानक जाऊन कृषी केंद्र तसेच विक्रेत्यांची तपासणी करणार आहे. जिल्हास्तरावर संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कक्षामार्फत कापूस, सोयाबीन, कडधान्य, बियाणांच्या वितरणावर नियंत्रण ठेवून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देणार आहे. शेतकऱ्यांना अप्रमाणित बियाणांची विक्री होऊ नये म्हणून विशेष लक्ष केंद्रीत असणार आहे. बियाणे निरीक्षकांमार्फत बियाणांचे नुमने काढून शेतकऱ्यांनी माहिती देण्यात येणार असल्याचे कृषी विभााकडून सांगण्यात आले. पथकांसोबत गुणवत्ता नियंत्रण अभियानही राबविण्यात येणार आहे. त्यातंर्गत जिल्ह्यस्तरावर सहा, उपविभागस्तरावर ४ तर तालुकास्तरावर एकूण १६ असे २६ गुणनियंत्रण निरीक्षक कार्यरत आहेत. शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार खते, बियाणे, किटकनाशके उपलब्ध होण्यासारी निरीक्षकांन नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बियाणांचे ५१२, खतांचे ३१९ व किटकनाशकांचे १२७ नमुने काढण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कृषी अधीक्षक दशरथ तांभाळे म्हणाले, नऊ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना काही शंका अथवा काही तक्रार आल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा. संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. खरीप हंगामात किटकनाशके, खतांच्या व बियाणांच्या उत्पादन स्थळांची तपासणीही करण्यात येणार आहे.
बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी नऊ पथके
By admin | Published: May 14, 2017 12:36 AM