परभणी: जिल्ह्यात गणेश विसर्जन शांततेत पार पडावे, यासाठी पोलिस प्रशासनाने बंदोबस्त सज्ज ठेवला आहे. पोलिस दलातील ९० टक्के कर्मचारी बंदोबस्तासाठी नियुक्त केल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली.८ आॅगस्ट रोजी श्री गणेश विसर्जन होणार आहे. या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी हा बंदोबस्त लावण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, उपविभागीय पोलिस अधिकारी लता फड, व्ही.एन. जटाळे, एस.एच. केंगार, सी.आर. रोडे, किशोर काळे, परिविक्षाधीन पोलिस उपाधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली हा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यात १७ पोलिस निरीक्षक, ७६ सहाय्यक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक, ७५ मुख्यालयीन कर्मचारी, ९५ नवपरिष्ठ पुरुष व महिला कर्मचारी तसेच शहर वाहतूक शाखेचे ४० कर्मचारी तैनात केले आहेत. लातूर जिल्ह्यातून २ पोलिस उपाधीक्षक, नाशिक येथील दहा पोलिस उपनिरीक्षक, नागपूर प्रशिक्षण केंद्रातील २५, लातूर केंद्रातील ७५, एसआरपीची १ कंपनी असा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच ७०० पुरुष आणि १०० महिला होमगार्डची नियुक्ती केली आहे. (प्रतिनिधी)
नव्वद टक्के कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात
By admin | Published: September 08, 2014 12:00 AM