शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

जिल्हा बँक अध्यक्षपदी नितीन पाटील बिनविरोध; दादांबद्दल सहानुभूती व नानांच्या मुत्सद्देगिरीचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 6:07 PM

अध्यक्षपदावरून निवडणूक होऊ शकली असती. पण ती टाळण्यात यश मिळाले.

ठळक मुद्देसंचालक मंडळाची मुदत मे २०२० पर्यंततोपर्यंत नितीन पाटील यांना अध्यक्ष करण्याचा निर्णय

- स. सो. खंडाळकर

औरंगाबाद : दिवंगत सुरेशदादा पाटील यांच्याबद्दलच्या सहानुभूतीचा व महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मुत्सद्देगिरीचा विजय म्हणजे नितीन पाटील यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी झालेली बिनविरोध निवड होय. खरं तर, ‘नाना तुम्हीच अध्यक्ष व्हा’ असा बहुतांश संचालकांचा सूर होता. पण नानांना तर अध्यक्ष व्हायचं नव्हतं. ते स्वाभाविकही होतं. आधीच महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची मोठी व महत्त्वाची जबाबदारी...त्यात औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्षपदही त्यांच्याचकडे आणि आता तोंडावर आलेल्या विधानसभेच्या निवडणुका. फुलंब्री मतदारसंघातून लढायची सुरू असलेली तयारी... या  पार्श्वभूमीवर बागडे यांना जिल्हा बँकेचे अध्यक्षपद स्वीकारणे अशक्यच होते. 

गुरूवारी सकाळी अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया सुरू होण्याआधी बँकेचे सर्व संचालक एकत्र जमले. त्यावेळी नाना तुम्हीच अध्यक्ष व्हा, असा संचालकांचा सूर होता. नानांना मोठी पसंती होती; पण नानांनी सांगितलं, मी अध्यक्ष होणार नाही. पण मी सांगतो, त्या उमेदवाराला पाठिंबा द्या. नानांच्या मनात नितीन पाटील यांनाच अध्यक्ष करायचं होतं. सुरेशदादा पाटील यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळीही नितीन पाटील यांना अध्यक्षपद दिलं जावं, असा सहानुभूतीचा सूर निघाला होता. 

नितीन पाटील बिनविरोधसुरेश पाटील यांच्याबद्दलची सहानुभूती, वर्षानुवर्षे त्यांच्यासमवेत काम करण्याची मिळालेली संधी, त्यांचा काटकसरी स्वभाव, त्यांनी वेळोवेळी केलेली मदत यातून उतराई होण्याची हीच संधी असल्याची भावना अनेक संचालकांना झाली होती. काही संचालकांनी नितीन पाटील नको असा सूर काढला. हे संचालक सुरेशदादांच्या विरोधातही भूमिका घेतच होते. ते पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांच्या पाठीमागे एकवटले. पण हरिभाऊ बागडे यांनी त्यांनाही समजावून सांगितले आणि संभाव्य निवडणूकही टाळली व नितीन पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून घेतले. 

बॅँकेचा दर्जा टिकविण्याचे आव्हाननंतर पत्रकारांशी बोलताना बागडेनाना म्हणाले, बँकेचा अध्यक्ष कोण होणार याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता होती. या पदासाठी इच्छुकही होते, नाही असं नाही. सुरेश पाटील यांनी बँकेचा कारभार चांगल्या प्रकारे सांभाळला होता. संचालक मंडळाची मुदत मे २०२० पर्यंत आहे. तोपर्यंत नितीन पाटील यांना अध्यक्ष करावे, असा संचालक मंडळाचा निर्णय झाला. बँकेचा ‘अ’ दर्जा टिकविणे, कर्ज वसुली वाढविणे, ही आव्हाने आहेत. बँक फार मोठ्या नफ्यात नाही. कर्जमाफीमुळे नफा कमी झाला. आता वसुली वाढवावी लागेल, असे मतही नानांनी यावेळी मांडले.

सर्वपक्षीय सोबत : दादांचा शिरस्ता पुढेहीसुरेशदादा पाटील हे संचालकांच्या निवडणुकीत सर्व जाती, धर्म व पक्षांचे प्रतिनिधी सोबत घेत असत. आताच्याही संचालक मंडळात मतदानास पात्र एकूण १९ संचालकांपैकी तीन भाजपचे, तीन शिवसेनेचे, तीन राष्टÑवादी काँग्रेसचे, एक शिवसंग्राम पक्षाचे व उर्वरित संचालक काँग्रेसचे, असे पक्षीय बलाबल आहे. स्वत: हरिभाऊ बागडे हे भाजपचे आहेत. पण त्यांनीही पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून सुरेशदादांप्रमाणेच सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा प्रयत्न केला. म्हणून नितीन पाटील यांचा बिनविरोध विजय शक्य झाला. अन्यथा आताही अध्यक्षपदावरून निवडणूक होऊ शकली असती. पण ती टाळण्यात यश मिळाले. हे महत्त्वाचे....! राजकीय व सहकारी क्षेत्राच्या दृष्टीने एक चांगला संदेश यातून गेला, एवढं मात्र खरं.

टॅग्स :bankबँकAurangabadऔरंगाबादHaribhau Bagadeहरिभाऊ बागडे