शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

अकरावीच्या प्रवेशापूर्वीच नितीनने घेतला निरोप

By admin | Published: June 28, 2017 12:35 AM

गढी : दहावीत तो चांगले टक्के घेऊन पास झाला. त्यानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी गढी येथील नवोदय विद्यालयात जात होता. परंतु रस्त्यातच काळाने घाला घातला.

लोकमत न्यूज नेटवर्कगढी : दहावीत तो चांगले टक्के घेऊन पास झाला. त्यानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी गढी येथील नवोदय विद्यालयात जात होता. परंतु रस्त्यातच काळाने घाला घातला. तो ज्या रिक्षात होता तो रिक्षा उलटल्याने तो जागीच ठार झाला. तर त्याच्या आईसह इतर चौघे गंभीर जखमी झाले. ही घटना सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी घडली.नितीन अशोक दहिफळे (१७ रा.खंडाळा ता.बीड) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. वडिलांचे छत्र हरवलेले असल्याने नितीनच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी आई सुलोचना यांच्यावर होती. घरी दीड एकर जमीन असून आई अंगणवाडी सेविका म्हणून काम करतात. नितीन त्यांना एकुलता एक होता. त्याला चांगले शिक्षण मिळावे, यासाठी त्यांची नेहमी धडपड होती. दहावीत त्याने ७० टक्के गुण घेतल्याने त्याला अकरावीचा प्रवेश गढी येथील नवोदय विद्यालयात घेण्यासाठी ते मंगळवारी सकाळी गेले होते. एवढ्यात रस्त्यातच त्यांच्यावर काळा घाला घातला. ते ज्या रिक्षात (एमएच २३- सी ७४२९) होते, तो रिक्षा रांजणी फाट्याजवळ उलटला. रिक्षाच्या कडेला असल्यामुळे तो यामध्ये दबला गेला आणि जागीच ठार झाला. तर आई सुलोचना दहिफळे यांच्यासह सुरेखा सवासे (३२ रा.साष्ट पिंपळगाव जि.जालना), नारायण सावंत (६३, रा.रांजणी) व अन्य एक असे चौघे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ गेवराईच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले.