लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आयुक्त म्हणून येणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याला महापालिका प्रयोगशाळा वाटत आहे. मनात येईल त्याप्रमाणे प्रत्येक अधिकारी काम करीत आहे. महापालिकेची प्रयोगशाळा अजिबात होऊ देणार नाही, सर्वसाधारण सभा प्रत्येक निर्णय घेण्यासाठी सक्षम असल्याचा सज्जड दम आज महापौर बापू घडामोडे यांनी दिला.मंगळवारी महापालिकेची नियमित सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. आयुक्त डी. एम. मुगळीकर बैठकीनिमित्त मुंबईला गेले होते. आयुक्त नसल्याने बैठकीस सुरुवात झाली. सभेत शहरातील निधन झालेल्या विविध मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच दहावीच्या परीक्षेत मनपा शाळेतून पहिला क्रमांक मिळवलेल्या नारेगावच्या मनपा शाळेतील महेंद्र माणिक मोरे या विद्यार्थ्याचे, मुख्याध्यापक व शाळेतील शिक्षक तसेच शाळा दत्तक घेणाऱ्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. यानंतर सभागृहनेता गजानन मनगटे यांनी मनपा आयुक्त सर्वसाधारण सभेला उपस्थित नसल्याबद्दल सभा तहकूब करण्यात यावी, असा प्रस्ताव मांडला.
मनपा म्हणजे प्रयोगशाळा नव्हे!
By admin | Published: June 21, 2017 12:07 AM