शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

संत एकनाथ रंगमंदिराचा कायापालट नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:30 AM

संत एकनाथ नाट्यमंदिर १५ आॅगस्टपासून बंद करून त्याचा संपूर्ण कायापालट करण्याची घोषणा आता एक महिना होऊनही सत्यात उतरलेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला मराठी अभिनेते सुमित राघवन यांनी नाट्यगृहांच्या दुरवस्थेवरून शहर प्रशासनाचा नाकर्तेपणा सर्वांसमोर आणल्यानंतर तरी काही फरक पडेल, अशी अपेक्षा बाळगणाºया नाट्यप्रेमींचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. संत एकनाथ नाट्यमंदिर १५ आॅगस्टपासून बंद करून त्याचा संपूर्ण कायापालट करण्याची घोषणा आता एक महिना होऊनही सत्यात उतरलेली नाही.तुटलेला रंगमंच, मोडलेल्या खुर्च्या, फाटलेल्या विंग, कचरा, कोपºयांमध्ये थुंकलेले, मेकअप रूमची दुरवस्था, दुर्गंधीयुक्त स्वच्छतागृहे, अशा एक ना अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या संत एकनाथ रंगमंदिराचे हे हाल सुमित राघवनने फेसबुकवरून सर्व जगासमोर मांडले होते. या नाचक्कीमुळे खडबडून जागे झालेल्या लोकप्रतिनिधी व मनपाने नाट्यगृहाचा कायापालट करण्यासाठी आश्वासने आणि कोट्यवधी रुपयांच्या निधीचा पाऊस पाडला.१५ आॅगस्टपासून नाट्यगृह संपूर्णपणे बंद करून आगामी काही महिन्यांमध्ये नूतनीकरण करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली होती. मात्र, आता एक महिना उलटूनही व्यवस्थापनाने यादृष्टीने कोणतेही पाऊल उचलले नाही. म्हणजे पहिले पाढे पंच्चावन, अशी स्थिती आहे. याविषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी व्यवस्थापकांशी संपर्क होऊ शकला नाही. नाट्यगृहात राजरोसपणे बुकिंग केली जात असून, कार्यक्रम होत आहेत.शहरातील नाट्यविश्वाचा केंद्रबिंदू म्हणून संत एकनाथ रंगमंदिर ओळखले जाते. मागच्या तीन दशकांपासून अनेक दिग्गज कलाकार आणि गाजलेल्या व्यावसायिक नाटकांचे प्रयोग येथे झालेले आहेत. म्हणून तर सिडको येथे अधिक प्रशस्त व आधुनिक संत तुकाराम नाट्यगृह असूनही नाट्य निर्माते संत एकनाथ रंगमंदिरातच प्रयोग ठेवण्याचा आग्रह धरतात.सुविधांअभावी मात्र अलीकडे अनेक नाट्यकर्मींनी उघड उघड टीका केली आहे. प्रशांत दामले यांनी तर स्वत: झाडू मारून प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घातले होते. शहरातील नाट्यप्रेमींनी ‘नावासाठी नाही गावासाठी’ या संकल्पनेवर आधारित गट स्थापन करून वेळोवेळी नाट्यगृहांची व्यथा मांडली. मात्र, ढिम्म प्रशासनावर याचा परिणाम झाला नाही.