शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

शेतकरी नवरा नको गं बाई ! डॉक्टर, इंजिनिअर किंवा नोकरदारच हवा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 4:32 PM

एक काळ असा होता, जेव्हा मुलाचा होकार आला की, मुलीचा होकार आपोआपच गृहीत धरला जायचा आणि धूमधडाक्यात लग्न लावून दिले जायचे.

ठळक मुद्देआता मात्र लग्नासाठी मुलीचा होकार मिळवायला, मुलांना काय काय दिव्यातून जावे लागत आहेनोकरदार मुलांनाच सर्वाधिक प्राधान्य असून शेतकरी नवरा ही संकल्पना मुलींच्या दृष्टीने कधीच ‘आऊटडेटेड’झाली आहे.

- रुचिका पालोदकर

औरंगाबाद : स्वप्नातला राजकुमार कसा असावा, हे आजच्या मुलींनी ठामपणे ठरवून टाकले आहे. मोठ्या शहरांचा झगमगाट, मॉडर्न राहण्याची ओढ आणि राजा- राणीचा संसारच सुखी संसार हा झालेला भ्रम यामुळे शेतकरी नवरा नको गं बाई !, डॉक्टर, इंजिनिअर किंवा नोकरदारच नवरा हवा....अशा अटी जवळपास सर्वच मुलींनी घातल्या आहेत. या अटींची पूर्तता करता करता मात्र नवऱ्या मुलाच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या अक्षरश: नाकी नऊ येत आहेत.

एक काळ असा होता, जेव्हा मुलाचा होकार आला की, मुलीचा होकार आपोआपच गृहीत धरला जायचा आणि धूमधडाक्यात लग्न लावून दिले जायचे. आता मात्र लग्नासाठी मुलीचा होकार मिळवायला, मुलांना काय काय दिव्यातून जावे लागत आहे, याचा अनुभव वधू-वर सूचक केंद्र चालविणारी मंडळी रोजच घेत आहेत. नोकरदार मुलांनाच सर्वाधिक प्राधान्य असून शेतकरी नवरा ही संकल्पना मुलींच्या दृष्टीने कधीच ‘आऊटडेटेड’झाली आहे.जागतिकीकरण, शिक्षण किंवा स्वातंत्र्य यांचा हा एकत्रित परिणाम असेल; पण मुलींच्या अवास्तव मागण्यांपायी लग्नाचे वय आणि पालकांची हतबलता वाढते आहे, एवढे मात्र नक्की. सर्वच समाजातील मुलींच्या वाढत्या अपेक्षा हा दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत जाणारा प्रश्न आहे, असे काही वधू-वर सूचक केंद्रांतर्फे सांगण्यात आले.

पुणे- मुंबईचाच नवरा हवामुलगी खेड्यातली असो, तालुक्यातली किंवा मुंबई-पुणे वगळता अन्य शहरातली असो. प्रत्येकीला नवरा पाहिजे आहे तो पुण्याचा किंवा मुंबईचा आणि गलेगठ्ठ पगाराचा. डॉक्टर, सीए अशा प्रोफेशनमध्ये असणाऱ्या मुली सारख्या प्रोफेशनमधील नवरा असावा, अशी मागणी करत आहेत. तरीही इंजिनिअर, सीए मुलांना मुलींची सर्वाधिक पसंती मिळत आहे. शेतकरी मुलगा तर मुलींच्या हिशेबातही नाही. मग त्याची १०० एकर शेती असली तरीही मुलींना तो नकोच आहे.

या अटी मान्य असतील, तरच बोला !- पुणे, मुंबई किंवा मेट्रो सिटी नाही तर थेट परदेशी राहणारा उच्चशिक्षित आणि भरभक्कम पगाराचा नवरा हवा.- मुलाचे वय आपल्यापेक्षा २- ३ वर्षांनीच जास्त असावे.- स्वत:चे घर आणि तेही सर्व सोयी-सुविधा असलेलेच हवे. शिवाय कोणतेच हप्ते मागे नकोत.- चारचाकी गाडी तर पाहिजेच.- मुलाच्या आई-वडिलांना त्यांची स्वत:ची मिळकत असावी. मुलाच्या पगारावर ते अवलंबून नसावेत.- मुलावर बहीण किंवा भावाची जबाबदारी नसावी.

शेतकरी वरपिता म्हणतोमुलगी काळी असो किंवा गोरी असो. शिकलेली असो की अडाणी असो. गरीब घरची असली तरीही चालेल. कशीही मुलगी असली तरी आम्ही लग्न करून घेऊ, तिने फक्त लग्नासाठी होकार द्यावा, अशी हतबलता अनेक शेतकरी वरपिता वधू-वर सूचक मंडळांकडे बोलून दाखवत आहेत.

मुलींच्या अपेक्षा खूप वाढल्याऔरंगाबाद, जालना यासारख्या शहरात राहायलाही मुली तयार नाहीत. त्यामुळे तालुका किंवा खेड्यात राहणारा नवरा करण्याचा प्रश्नच येत नाही. ४०-४५ हजार रुपये मासिक पगार असणाऱ्या मुलांनाही मुली नाकारत आहेत. पूर्वी मुलांच्या अटी असायच्या, आता मात्र मुली अटी ठेवत असून त्यांच्या अपेक्षा खूप वाढत चालल्या आहेत. या नादात त्यांचे स्वत:चे लग्नाचे वय उलटून जात आहे, याचेही त्यांना भान नाही.- सुनील काला, पुलक मंच

आई-वडिलांच्या अपेक्षा वाढल्याआपल्याला जे मिळाले नाही, ते आपल्या मुलीला द्यावे, हा पालकांचा प्रयत्न असतो. त्या नादात मुलींप्रमाणे त्यांच्या पालकांच्याही खूप अपेक्षा वाढल्या आहेत. गाडी, बंगला, बँक बॅलेन्स हे सगळे करताना मुलांचे वय तिशीच्या पुढे निघून जाते, टक्कल पडायला लागते. अशा मुलांनाही मग ‘सगळे चांगले आहे; पण मुलगा एजेड दिसतोय’, असे म्हणत मुली नाकारतात.- विजया कुलकर्णी, ब्राह्मण महिला मंचचे वधू-वर परिचय मंडळ 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी