शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

दोस्त दोस्त ना रहा : वैजापूर न.प. निवडणुकीचा आखाडा तापला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:30 AM

येथील न.प. निवडणुकीचा आखाडा तापला असून काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भाजपने आपापल्या जोरावर निवडणूक लढविण्याची म्हणजेच स्वत:च्या झेंड्यांखाली विरोधकांची उणीदुणी काढण्याची घोषणा केली. त्यामुळे कालपर्यंत गळ्यात गळे, मांडीला मांडी आणि खांद्याला खांदा लावणारे नेते आज एकमेकांवरच शब्दांच्या पिचकाऱ्या उडवून शिमगा खेळताना दिसणार आहेत. म्हणजे यांचे खरे शत्रू कोण आणि मित्र कोण याचा संशयकल्लोळ वैजापूरच्या राजकारणात चालू आहे.

मोबीन खानवैजापूर : येथील न.प. निवडणुकीचा आखाडा तापला असून काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भाजपने आपापल्या जोरावर निवडणूक लढविण्याची म्हणजेच स्वत:च्या झेंड्यांखाली विरोधकांची उणीदुणी काढण्याची घोषणा केली. त्यामुळे कालपर्यंत गळ्यात गळे, मांडीला मांडी आणि खांद्याला खांदा लावणारे नेते आज एकमेकांवरच शब्दांच्या पिचकाऱ्या उडवून शिमगा खेळताना दिसणार आहेत. म्हणजे यांचे खरे शत्रू कोण आणि मित्र कोण याचा संशयकल्लोळ वैजापूरच्या राजकारणात चालू आहे.

निवडणूक बदलली की राजकीय समीकरणात बदल होतात. युत्या-आघाड्या तसेच मित्र-शत्रू बदलतात. या राजकीय गणितांचा पुनश्च अनुभव देणाºया वैजापूर नगर परिषद निवडणुकीने शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून राजकारणातील सर्व डावपेच कृतीत आणताना बेरजेच्या राजकारणावर भर दिला जात आहे. मात्र, जनाधार नेमका कोणाला साथ देईल, याचा अंदाज कठीण बनल्याचेच चित्र शहरात दिसून येत आहे. नगर परिषद निवडणूक रिंगणात नेमके किती अन् कोणते उमेदवार असणार हे येत्या २६ मार्चला स्पष्ट होणार आहे. सद्यस्थितीचा विचार करता प्रामुख्याने शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, एम.आय.एम.चे उमेदवार रिंगणात आहेत. याशिवाय अपक्ष उमेदवारांचीही मोठी संख्या असल्याने येथील निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एकेकाळचे मित्र असलेल्या, मात्र आता पालिका निवडणुकीत राजकीय विरोधक असलेल्या आपल्याच मित्रांना पराभूत करण्याची वेळ माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांच्यावर आली असून यामध्ये नेमके कोण यशस्वी होतो, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. भाजपकडून शिल्पा परदेशी या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. शिल्पा परदेशी या माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांच्या पत्नी असल्याने ही निवडणूक परदेशींसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. शिवसेनेच्या वतीने माजी नगराध्यक्ष साबेर खान यांची सून सय्यद तशफा अझहर अली नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. याशिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी व एम.आय.एम.ने काही प्रभागात आपले उमेदवार उभे केले असून नगराध्यक्षपदासाठी डॉ. राजीव डोंगरे यांच्या पत्नी विजया डोंगरे यांचे ऐन वेळेवर भाजपकडून तिकीट कापले गेल्याने त्यांनी अपक्ष म्हणून नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवारी अर्ज सादर केल्याने त्या ऐन वेळेवर काँग्रेससोबत जाणार की अपक्ष तिकीटावरच निवडणूक लढविवार यावर अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

जनतेतून नगराध्यक्षासह अकरा प्रभागातून २३ नगरसेवक निवडले जाणार असताना नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदासाठीही मोठी चुरस निर्माण झाली आहे. काही आजी माजी नगरसेवकांसह शहरातील चर्चेतील पदाधिकाºयांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले असून बहुतेक जण मतदारांशी संपर्क साधून असल्याने सर्व लढती चुरशीने होण्याचीच चिन्हे दिसून येत आहेत.

नव्या समीकरणांची जुळवणी होणार

शहरात शिवसेनेला आपली परिस्थिती भक्कम असल्याचे भाजपला दाखवायचे आहे. राष्ट्रवादीला देखील आपण शहरात दुसºया क्रमांकाचा पक्ष असल्याने आपले महत्त्व सिद्ध करायचे आहे. मात्र २६ मार्चनंतर राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस व शिवसेना यांच्यात समझोता होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. थेट नगराध्यक्षपदाची ही निवडणूक अधिक चुरशीची होणार यात शंकाच नाही. मात्र त्यानिमित्ताने नव्या समीकरणांची जुळवणी होणार आहे.

शहरात एकूण मतदारसंख्या ३८ हजार ९८९ असून त्यात सर्वाधिक मतदार संख्या मुस्लीम समाजाची १० हजार ७०४ आहे. त्यानंतर अनुसूचित जातीची मतदार संख्या ६ हजार २७९ अणि अनु. जमातीची मतदारसंख्या १ हजार ३१ असून व इतर समाजाचे २० हजार ९७५ मतदार आहेत. शहरात रणकंदन होत असताना अत्यंत उदासिनतेने नागरिक याकडे पाहत आहेत. ठराविक मंडळीपुरताच हा मर्यादित खेळ ठरल्याचे स्पष्ट चित्र सध्या शहरात पाहावयास मिळत आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा