औरंगाबाद : खाजगी ट्रॅव्हल्सचा मनमानी कारभार सुरू आहे. प्रवाशांकडून मनमानी भाडे वसूल करण्यात येत आहे. कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती भाडे राहील, याचे फलक ट्रॅव्हल्स कंपन्यांनी लावले पाहिजे. परंतु तसे काहीही होत नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान सुरू आहे, असे अॅड.असीम सरोदे म्हणाले.
पत्रकार परिषदेत संवाद साधताना अॅड.असीम सरोदे म्हणाले, सुट्ट्यांच्या कालावधीत किती दर राहतील, याबाबत तपशील असावा. बस तपासणी सोबत दर किती आकारले जातात , याबाबत तपासणी केली पाहिजे. गरिबाच्या व्यवसायाची तपासणी होते. पण धनदांडग्या लोकांच्या व्यवसायांची तपासणी का होत नाही. न्यायाधीशांनी स्वतः दखल घ्यायला हवी. आरटीओ आणि पोलीस यांनी संयुक्त कारवाई करावी. टप्पा वाहतूक खाजगी बसला मंजुरी नाही.
बसवर कारवाई व्हावी, आम्ही देखील तिकीट जमा करून याचिका दखल करू शकतो. मात्र आम्ही कितीवेळा करायचं. लोकांना जाणीव व्हायला हवी. महाराष्ट्रात दीड लाख खाजगी बस चालतात. सरकारने चांगल्या बसेस आणायला काय अडचण आहे, असे ते म्हणाले.