शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

गर्भपात करणाऱ्या रुग्णालयाची ना नोंदणी, ना डॉक्टरकडे सर्टीफिकेट

By admin | Published: March 16, 2016 8:29 AM

नांदेड : शहरातील खुशालसिंह नगरमध्ये बिनबोभाटपणे रुग्णांच्या जीविताशी खेळ सुरू असल्याची बाब पुढे आली आहे़

नांदेड : शहरातील खुशालसिंह नगरमध्ये बिनबोभाटपणे रुग्णांच्या जीविताशी खेळ सुरू असल्याची बाब पुढे आली आहे़ सोमवारी रात्री अवैधरित्या गर्भपात करणाऱ्या डॉक्टरकडे कोणतीही पदवी नसल्याची तसेच सदर रुग्णालयाची कुठेही नोंदणी नसल्याची धक्कादायक बाबही उघडकीस आली आहे़सोमवारी रात्री खुशालसिंह नगरात संत ज्ञानेश्वर हॉस्पिटलमध्ये डॉ़बालाजी मोरलवार याने अवैधरित्या एका महिलेचा गर्भपात केला़ सदर माहिती पोलिसांनी महापालिका पथकाला मिळाल्यानंतर येथे धाड टाकून रंगेहाथ डॉक्टरला पकडण्यात आले़ याप्रकरणी महापालिकेचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ़ मोहंमद आसीफ यांच्या तक्रारीवरून विमानतळ पोलिस ठाण्यात डॉ़मोरलवार याच्याविरूद्ध कलम ३१५, ३१८ भादंवि, मेडिकल टर्मिनेशन आॅफ प्रेग्नंसी अ‍ॅक्टमधील कलम ३, ४ आणि बॉम्बे नर्सिंग होम अ‍ॅक्टमधील कलम ३,४,५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे़ सदर डॉक्टरास सोमवारी रात्रीच अटक करण्यात आली आहे़दरम्यान, खुशालसिंहनगरात सुरू असलेल्या संत ज्ञानेश्वर हॉस्पिटलची कोणतीही नोंदणी महापालिका अथवा अन्य कुठेही नव्हती़ तसेच डॉ़ मोरलवार यांच्याकडे कोणतेही वैद्यकीय शिक्षणाचे प्रमाणपत्रही नसल्याचे महापालिकेचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ़ मोहम्मद आसीफ यांनी सांगितले़ तेव्हा शहरात गेल्या अनेक दिवसांपासून डॉ़ मोरलवार याचा धंदा बिनबोभाटपणे सुरू असल्याचे स्पष्ट होते़ शहरात असे किती रुग्णालये अवैधरित्या सुरू आहेत याची माहिती प्रशासनाला नसावी हेही नवलच आहे़ याचा फटका मात्र सामान्य रुग्णांना बसत आहे़ गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्यान्वये स्थापित करण्यात आलेल्या सल्लागार समितीची बैठक १२ जानेवारी रोजी शहरात घेण्यात आली होती़ या समितीवर अशा प्रकारांना आळा घालण्याच्या उपाययोजना करण्याची जबाबदारी आहे़ या समितीकडून शहरातील किती रुग्णालयाला भेटी देवून गर्भलिंग तपासणी प्रतिबंधात्मक कारवाई केली़ याचीही माहिती पुढे येणे आवश्यक आहे़ (प्रतिनिधी)