शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
4
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
5
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
6
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
7
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
8
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
9
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
10
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
11
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
12
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
13
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
14
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
15
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
16
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
17
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
18
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"
19
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
20
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?

रस्ता खोदून ना सूचनेचा बोर्ड, ना बॅरिकेड्स; दोघांच्या अपघातानंतर ठेकेदारावर थेट गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 8:03 PM

दाेन वर्षांपूर्वीच या ठिकाणी तयार केलेला सुस्थितीत असलेला डांबरी रस्ता खोदून सिमेंट रस्ता तयार करण्याचा घाट घातल्याने या रस्त्यावरून वाद निर्माण झाले होते.

छत्रपती संभाजीनगर : रस्त्यावरील ठेकेदाराने खोदलेल्या खड्ड्यात पडून दुचाकीस्वार बाप-लेक गंभीर जखमी झाले. या ठिकाणी आवश्यक सूचनेचा बोर्ड, बॅरिकेड्स न लावणाऱ्या ठेकेदारावर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२२ जुलै रोजी रात्री ९ वाजता जगन्नाथ बाबुराव कुलकर्णी (३९, रा. नारेगाव) हे त्यांचा १० वर्षांचा मुलगा सोहमसह दुचाकीने घरी जात होते. मुकुंदवाडी येथील एसटी वर्कशॉप येथून वळण घेऊन ते फॅक्सोप्लास कंपनीच्या दिशेने जात होते. काही दिवसांपासून हा डांबरी रस्ता संपूर्ण खोदून नव्याने सिमेंटचा रस्ता तयार करण्यात येत आहे. परंतु याच रस्त्यावर लुपिन कंपनीच्या कॉर्नरजवळ कुलकर्णी यांचा रस्त्यावर खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पडली. या अपघातात जगन्नाथ यांच्यासह त्यांचा लहान मुलगा गंभीररीत्या जखमी झाले. स्थानिकांनी धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. दोघेही यात गंभीररीत्या जखमी झाले. तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर जगन्नाथ यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी या रस्त्याचे काम घेतलेल्या ठेकेदारावर गुन्हा दाखल केला. मात्र, निनावी ठेकेदार म्हणून आरोपीचा उल्लेख करण्यात आला आहे.

यापूर्वी देखील या रस्त्यावरून वाददाेन वर्षांपूर्वीच या ठिकाणी तयार केलेला सुस्थितीत असलेला डांबरी रस्ता खोदून सिमेंट रस्ता तयार करण्याचा घाट घातल्याने या रस्त्यावरून वाद निर्माण झाले होते. जालना रोड, एसटी वर्कशॉप ते एमआयडीसी सिडको पोलिस ठाणे या मार्गावर हा रस्ता तयार केला जात आहे. एका राजकीय नेत्याच्या भावासह मोठ्या ठेकेदाराने या रस्त्याचे काम घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. काम घेतल्यानंतरही त्यात बेजबाबदारपणे खड्डे खोदून तसेच सोडून देण्यात आल्याने यापूर्वी येथे अनेक अपघात झाले. रविवारी अखेर, यात गुन्हा दाखल करण्यात आला. अंमलदार पंडित चव्हाण अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी