शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
3
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
4
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
5
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
6
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
7
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
8
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
9
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
10
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
11
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
12
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
13
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
14
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
15
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
16
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
17
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
18
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती
19
काँग्रेसच्या 'पंजा'ला बांधलेला वाघ अन् शिंदेंनी सोडला बाण; 'दसरा मेळावा' टीझरमध्ये ठाकरे निशाण्यावर
20
"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा

'कोणी गुलालही लावणार नाही,अन्...'; भुजबळांच्या गोळी मारणार विधानाचा जरांगेंकडून समाचार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 6:30 PM

आम्ही कोणत्याही समाजाबद्दल बोललो नाही पण तुम्हाला आता सुट्टी नाही.

- अमेय पाठक 

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांच्यातील वाद वाढतच जात आहेत. दरम्यान, मंत्री भुजबळ यांनी मला गोळी मारणार असल्याची शक्यता वर्तवली. या विधानाचा जरांगे यांनी समाचार घेतला असून, ' तुम्हाला कोणी गुलालही लावणार नाही, अन् तुम्ही गोळी मारण्याचे बोलता.' अशी टीका केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असताना जरांगे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.   जरांगे पुढे म्हणाले, मराठ्याबद्दल राग, विषारी भाषा बोलू नका, तुमच्या विरोधात आयुष्यभर बोलत राहणार. आम्ही कोणत्याही समाजाबद्दल बोललो नाही पण तुम्हाला आता सुट्टी नाही. हे विनाकारण धमकावत आहेत, असा आरोपही जरांगे यांनी यावेळी केला.  सरकारने जेव्हा स्टेटमेंट बदलायला सुरुवात केली. तेव्हा एका व्यक्तीसाठी हे आम्हाला फसवायला लागले हे आमच्या लक्षात आले आहे. जर आरक्षण दिलं नाही तर ६ कोटी जनतेच्या दारात उभं राहायचं नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला.

तसेच समाजाला १७ डिसेंबरला आम्ही पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बोलवलेलं असल्याची माहिती जरांगे यांनी दिली. या बैठकीला साहित्यिक, अभ्यासक, मराठा समाजाची उपस्थिती असेल. सकाळी ९ ते संध्याकाळी ६पर्यत ही बैठक होईल. यात पुढील आंदोलन कसं करायचं हे ठरवू, असेही जरांगे यांनी जाहीर केले. जी दिशा यात ठरेल ती फायनल असेल.पण शांततेत आंदोलन होईल. फक्त सरकारने आमच्या मागणीवर गंभीरपणे विचार करावा, अन्यथा त्यांना हे आंदोलन अवघड जाईल, असा इशारा जरांगे यांनी दिला.

भुजबळ यांना बळ देऊ नका छगन भुजबळ हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. ते बोलत असल्यानेच गावांगावांत जातीय तणाव निर्माण होत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. बीडची दंगल यांनीच घडवून आणली असून त्यांना बळ देऊ नका, असे सरकारला आवाहनही जरांगे यांनी केले. भुजबळ यांचे ऐकून मराठ्यांच वाटोळं करू नका. यांनी महाराष्ट्र्र सदन खाल्लं तरी याची केस तुम्ही मागे घ्यायला लागलेत. सगळा महाराष्ट्र याने खाल्ला, तरीही फडणवीस साहेब याला बळ द्यायला लागले असं दिसतं आहे, असा आरोपही जरांगे यांनी केला. आम्ही शांततेच आवाहन करतो आणि हे लोकांना भडकवतात. तुम्ही जर असंच करत राहिले तर आम्हाला मोठं आंदोलन उभं करावं लागेल, असा इशारा जरांगे यांनी यावेळी दिला.

फडणवीस यांना इशाराआम्हाला आश्वासन देण्यासाठी तिन्ही गटाचे लोक होते. आमच्याकडे सगळे कागदांचे फोटो आणि व्हिडीओ आहेत. एक महिन्यात गुन्हे मागे घेऊ असं सांगितलं, अटक करणार नाही असं सांगितलं, असताना या भुजबळच ऐकून निष्पाप पोर राज्यभर अटक केले. भुजबळ बोलत असल्यापासून फडणवीस  लक्ष देत नाहीत. बच्चू कडू याला साक्षीदार आहेत. फडणवीस साहेब तुमच्या बद्दल मराठ्यांमध्ये नाराजी पसरवू देऊ नका, अन्यथा तुम्हाला प्रचंड जड जाईल. मराठ्यांचा रोष घ्यावा लागेल, असेही जरांगे म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळAurangabadऔरंगाबाद