सोमनाथ खताळ , बीडमागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र, आॅनलाईन अर्जप्रक्रिया धिम्या गतीने सुरु असल्याने शैक्षणिक वर्ष उलटत आले तरी ४० हजारांवर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तर मिळलाची नाही; परंतु हेळसांड, मनस्तापाची शिक्षा मात्र मिळाली आहे़ उल्लेखनीय असे की, ही स्थिती केवळ जिल्ह्यातच आहे, असे नाही तर राज्यातही याहून वेगळे चित्र नाही़मागासवर्गीय प्रवर्गतील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन, उच्चशिक्षण घेता यावे, विद्यार्थ्यांचे शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी व्हावे हा उद्देश डोळ्यासमारे ठेवून सरकारने समाजकल्याण मार्फत भारत सरकारची शिष्यवृत्ती योजना देण्याचे जाहिर केले.तीन वर्षापूर्वी अभ्यासक्रम व महाविद्यालयांचा डाटा आॅनलाईन करण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अर्जही आॅनलाईन पद्धतीने भरले जावू लागले. मात्र यावर्षी सप्टेंबर, आॅक्टोबर मध्ये समाजकल्याणने पुन्हा महाविद्यालयांची माहिती मागविली आहे. आता ही माहिती गोळा करता करता महाविद्यालये आणि समाजकल्याणच्या नाके नऊ आले आहे. या शिष्यवृत्तीचे काम पुणे येथील एका खाजगी कंपनीला देण्यात आले आहे. मात्र या कंपनीकडून हे काम संथगतीने सुरू असल्याचा अरोप होत असून त्यामुळेच आॅनलाईन अर्जाची गती कमी झाली आहे.‘आॅनलाईन’ ला फाटाजिल्ह्यात ४३६ महाविद्यालेय आहेत़ समाजकल्याण विभागाने महाविद्यालयांची माहिती आॅनलाईन मागविली आहे. मात्र आजही ३०० च्या आसपास महाविद्यालये आॅनलाईन नाहीत़ मंजूरीसाठी किमान दोन महिन्याचा अवधीमहाविद्यालये आॅनलाईन झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेतले जाणार. त्यानंतर महाविद्यालये या अर्जांची तपासणी करणार आणि मग समाजकल्याणची याला मंजूर मिळणार. अर्ज भरल्यापासून मंजूरीच्या प्रक्रियेला सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने मोठी अडचण निर्माण झाली असल्याचे प्राचार्य डॉॅ. नामेदव सानप यांनी सांगितले.पाठपुरावा सुरु समाजकल्याण सहायक आयुक्त आर.एम.शिंदे म्हणाले, यासंदर्भात बैठक घेतली आहे. यामध्ये सर्व्हरची कॅपेसीटी वाढविणे, अर्जामध्ये ‘एडीट’ आॅप्शन अॅड करणे, फॉर्मेट चेंज करण्यासंदर्भात निर्णय घेतले आहेत. लवकरच प्रक्रिया सुरळीत करण्यात येईल. विद्यार्थी वंचित राहणार नाहीत़विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी बीडच्या विद्यार्थी संघटना नेहमी आवाज उठवत असतात. मात्र शिष्यवृत्ती योजनेचा बोऱ्या वाजलेला असतानाही विद्यार्थी संघटनांना अद्यापही जाग आलेली नाही. यावरून या संघटनांबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. एक-दोन नाही तर हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हा प्रश्न आहे. या संघटनांनी आवाज उठविला तर हा प्रश्न मार्गी लागू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे़
शिष्यवृत्ती नव्हे ‘शिक्षा’
By admin | Published: November 18, 2014 12:34 AM