मराठवाड्याला बजेटमध्ये वाटाण्याच्या अक्षता; वॉटरग्रीड पाहणीपुरतेच, नवीन योजनांचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 15:15 IST2025-03-11T15:10:14+5:302025-03-11T15:15:01+5:30

दळणवळणाच्या प्रकल्पांसह सिंचनासाठी घोषित केलेल्या प्रकल्पांच्या तुलनेत मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत.

No strong investment for Marathwada in state budget; only water grid survey, lack of new schemes | मराठवाड्याला बजेटमध्ये वाटाण्याच्या अक्षता; वॉटरग्रीड पाहणीपुरतेच, नवीन योजनांचा अभाव

मराठवाड्याला बजेटमध्ये वाटाण्याच्या अक्षता; वॉटरग्रीड पाहणीपुरतेच, नवीन योजनांचा अभाव

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याला राज्य अर्थसंकल्पातून काहीही हाती लागले नसल्याची टीका सुरू झाली आहे. मराठवाडा वॉटरग्रीड हा प्रदेशाला दुष्काळमुक्त करणारा प्रकल्प आर्थिक तरतुदीसह केव्हा सुरू होणार, हे काही निश्चित नाही.

दळणवळणाच्या प्रकल्पांसह सिंचनासाठी घोषित केलेल्या प्रकल्पांच्या तुलनेत मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत. मराठवाडा मंत्रिमंडळ बैठक २०२३ मधील ५९ हजार कोटींच्या व २०२४ मधील १४३४ कोटींच्या घोषणांपैकी कालबद्ध तरतुदीचा देखील अर्थसंकल्पात अभाव असल्याचे दिसून येत आहे. मंत्रिमंडळ बैठकीत सिंचनासाठी १४ हजार, तर विभागाच्या विविध योजना व उपक्रमांसाठी ४५ हजार कोटींचे पॅकेज सरकारने जाहीर केले हाेते. या घोषणांपैकी १० टक्के तरतुदी देखील प्रत्यक्षात आल्या नाहीत. त्याचा अर्थसंकल्पात फारसा उल्लेख आढळून आला नाही. जुन्याच योजनांचे कॅरीऑन बजेट असल्याचे काही सत्ताधारी आमदारांनीच खासगीत बोलताना सांगितले.

सिंचनाचे प्रकल्प आणि तरतूद
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प : ८८ हजार कोटींची तरतूद
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प : ७५०० कोटी
दमणगंगा-एकदरे-गोदावरी प्रकल्प : ३५०० कोटी
तापी महापुनर्भरण प्रकल्प : १९ हजार ३०० कोटी
उल्हास, वैतरणा नद्यांचे पाणी मराठवाड्यात वळविणार : ठोस तरतूद नाही

वॉटरग्रीडसाठी तरतूद
मराठवाडा वॉटरग्रीड योजना करण्यासाठी शासनाने अर्थसंकल्पात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
- संजय शिरसाट, पालकमंत्री

सर्वसमावेशक योजना
अर्थसंकल्पात सर्वसमावेशक योजनांचा समवेश केला आहे. सौरऊर्जेसाठी चांगली तरतूद आहे.
- अतुल सावे, ओबीसी कल्याण मंत्री

मराठवाड्याला कमी निधी
विदर्भाच्या तुलनेत मराठवाड्याला कमी निधी आहे. मराठवाडा वॉटरग्रीडसाठी तरतूद असली, तरी मंजूर प्रकल्पांचा निधी कपात होणार का, हा प्रश्न आहे.
- कल्याण काळे, खासदार

वॉटरग्रीडसाठी तरतूद नाही
मराठवाडा वॉटरग्रीडसाठी तरतूद नाही. वैनगंगा नळगंगा, नदीजोड प्रकल्पाची घोषणा केली. मात्र कामांना मुहूर्त कधी लागणार, हे स्पष्ट नाही.
- अंबादास दानवे, विरोधी पक्षनेता

या मुद्द्यांबाबत काहीही नाही : 
मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मारकाचा उल्लेख नाही.
विमानतळ धावपट्टी विस्तारीकरण भूसंपादन तरतूद नाही.
छत्रपती संभाजीनगर मनपाला ८२२ कोटी देण्यावर उल्लेख नाही.
हळद प्रक्रिया प्रकल्पासाठी तरतूद नाही.
नांदेड ते वाटूर फाटा चौपदरीकरणासाठी तरतूद नाही.
छत्रपती संभाजीनगर ते पुणे मार्गासाठी एमएसआयडीसी काय करतेय, याचा उल्लेख नाही.

१७ सप्टेंबर २०२४ रोजी केलेल्या १४३४ कोटींच्या घोषणांचे काय?
छत्रपती संभाजीनगर : २०० देवस्थानांसाठी सर्वज्ञ अष्टशताब्दी मार्ग २३४ कोटी.
जालना: रेशीम पार्क व प्रशिक्षण केंद्र २५ कोटी.
परभणी : गंगाखेड येथील संत जनाबाई तीर्थक्षेत्र विकास ५० कोटी.
नांदेड : श्रीक्षेत्र माहूरगड शक्तिपीठ कामांसाठी ८२९ कोटी १३ लाख.
हिंगोली : श्रीक्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकासासाठी ४५ कोटी १४ लाख.
बीड : परळी वैद्यनाथ आयटीआयमध्ये नवीन कार्यशाळा बांधण्यासाठी १५ कोटी.
धाराशिव : सोनारी भैरवनाथ देवस्थानासाठी १८६ कोटींना मंजुरी.
लातूर : धनेगाव, चाकूर येथील मुलींच्या शासकीय निवासी शाळेसाठी ५० कोटी.

Web Title: No strong investment for Marathwada in state budget; only water grid survey, lack of new schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.