छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठी, ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे अशा मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. १२ प्रकारच्या ओळखपत्रापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली.
यादीत नाव आहे, व्होटर आयडी नाही?मतदार यादीत नाव आहे, मात्र व्होटर आयडी नसेल तर आयोगाने सुचविलेल्या १२ पैकी एक पुरावा सादर करून मतदान करता येईल.
या ओळखपत्रावर चालणार कामआधार कार्ड, मनरेगाअंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह असलेले पासबुक, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहनचालक परवाना, पॅनकार्ड, स्मार्ट कार्ड, पारपत्र (पासपोर्ट), निवृत्तिवेतन दस्तावेज, केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांचे ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधान परिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र हे पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. अनिवासी भारतीयांना मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे.
पत्ता बदलला तरी जुने कार्ड चालणारएखाद्या मतदाराने मतदार यादीतील आपल्या पत्त्यात बदल केला असेल; पण त्याला अद्याप नवे ओळखपत्र मिळाले नसेल तर आधीचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल; मात्र त्या व्यक्तीचे नाव विद्यमान पत्त्यासह मतदार यादीत असणे आवश्यक आहे.
मनरेगाचे जॉबकार्डही चालणारमनरेगाअंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र देखील मतदार ओळखपत्र म्हणून चालेल.
‘डीजी लॉकर’मधली ओळखपत्रे चालतात का?यातील ओळखपत्रे चालणार नाहीत. १२ प्रकारच्या पुराव्यांपैकी एक पुरावा मतदार ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरले जाईल.
कलर झेरॉक्स, लॅमिनेशनवर गर्दी वाढलीकलर झेरॉक्स, लॅमिनेशन सेंटर्सवर सध्या मतदानासाठी लागणाऱ्या ओळखपत्रांचे कार्डस प्रिंट करण्यासाठी गर्दी दिसते आहे.