शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
2
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
3
IND vs NZ : भारताची आपल्या घरात 'कसोटी' तरी बुमराहला का विश्रांती? BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
4
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
5
गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!
6
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
7
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
8
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
9
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
10
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
11
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
12
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार
13
'सिंघम अगेन'च्या शेवटी मिळालं खास सरप्राइज! सलमान खानच्या एन्ट्रीने झाली नव्या सिनेमाची घोषणा
14
भारतात 2050 पर्यंत मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ होणार, 'या' 3 देशांत हिंदू जवळपास 'संपुष्टात' येणार!
15
'विराट' विक्रम मोडला! इथं पाहा IPL च्या इतिहासातील Expensive Retained Players ची यादी
16
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
17
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
18
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
19
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
20
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम

‘पाणी नाही, किमान वीज तरी द्या!’; शहरात रोजच होतेय दिवसा अन् रात्री बेरात्री वीज ‘गुल’

By संतोष हिरेमठ | Published: May 24, 2023 6:38 PM

ऐन उन्हाळ्यात हा प्रकार होत असल्याने उकाड्याने घामाघूम होण्याची वेळ ओढावते आहे.

छत्रपती संभाजीनगर : जगाच्या नकाशावर औद्योगिकनगरी, पर्यटननगरी म्हणून ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगरात नागरिकांना आठवड्यातून जेमतेम तासभर पाणी मिळते, पण या शहरात अखंडित वीजपुरवठाही होत नसल्याची चिंताजनक परिस्थिती आहे. शहरात कधीही अचानक वीजपुरवठा खंडित होतो. त्यातही गेल्या पाच दिवसांपासून रोज दिवसा व रात्रीही वीज ‘गुल’ होत आहे. महावितरणच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शहरात १८ मेपासून दररोज रात्री वीज गुल होते आहे. ऐन उन्हाळ्यात हा प्रकार होत असल्याने उकाड्याने घामाघूम होण्याची वेळ ओढावते आहे. मुंबई, पुण्यात वीज जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही, उन्हाळा असो की पावसाळा छत्रपती संभाजीनगरातच वारंवार वीज का ‘गुल’ होते, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. दरवर्षी मान्सूनपूर्व कामे केली जातात. परंतु, पहिल्या पावसापासून वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडतो. किमान यंदा तरी पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत राहण्याची अपेक्षा आहे.

जुनी यंत्रणा बदलावीमहावितरणने देखभाल-दुरुस्तीकडे लक्ष दिलेले नाही. विद्युत वाहिन्यांसह इतर यंत्रणा जुनी आहे. उन्हाळ्यात भार वाढतो. परंतु, त्या प्रमाणात देखभाल-दुरुस्ती होत नाही. त्यातून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार होत आहे. वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकाराविषयी महावितरणच्या अभियंत्यांशी वारंवार संपर्क साधण्यात आला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही.- हेमंत कपाडिया, ऊर्जा मंच

लहान-मोठ्या उद्योगांना फटकावीजपुरवठा खंडित होण्याचा फटका २४ तास प्राेसेसिंग असलेल्या उद्योगांना बसतो. वीज गेल्यानंतर प्रोसेसिंग थांबते आणि कच्च्या मालाचे नुकसान होते. त्यासोबत लहान-मोठ्या उद्योगांनाही नेहमीच फटका बसतो. अशावेळी महावितरणकडे तक्रार केली तर उडवाउडवीचे उत्तर मिळते.- वसंत वाघमारे, अध्यक्ष, वाळूज इंडस्ट्रियल असोसिएशन

कधीही जाते वीजवारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार होतो. पाणी येण्याच्या वेळेतही वीज जाते. त्याचाही फटका बसतो. गेल्या काही दिवसांपासून रात्री वीज जाण्याचे प्रमाण वाढले आहे.- दीपक संभेराव, वीज ग्राहक

शहरातील वीज ग्राहक- घरगुती- २,९६,११४- व्यावसायिक-३४,५५६- औद्योगिक- ९,७०३- दिवाबत्ती-१,४५९- शेतीपंप-२,१७९- पाणीपुरवठा - १०५- इतर २,३६१एकूण : ३,३४,४७७

- पाणीपुरवठा-४६- महिन्यांचे वीज बिलिंग-सुमारे १६८ कोटी रुपये.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादelectricityवीजtourismपर्यटन