शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योगसूर्याचा अस्त, रतन टाटा कालवश; ब्रीच कॅण्डी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
3
आजचे राशीभविष्य १० ऑक्टोबर २०२४; आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा
4
‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला
5
चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते
6
मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
7
अनपेक्षित निकालांचे आम्ही विश्लेषण करू; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची माहिती
8
हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका
9
मविआच्या ७० जागांचा तिढा अद्यापही सुटेना; २१८ जागांवर एकमत, बैठकीत बंडखोरी रोखण्यावर भर
10
लवकरच येणार कर्ज स्वस्ताई; RBIकडून व्याजदर ६.५ टक्क्यांवर कायम, आगामी बैठकीत कपातीचे संकेत
11
...तर बांधकामाच्या सर्व नव्या परवानग्या थांबवू; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा
12
STला मिळणार ३०० कोटी; बिल्डरांमार्फत ३८ जागांचा विकास, मुंबईतील मोक्याच्या जागांचा समावेश
13
१९ ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिली मंजुरी
14
AI मदतीने शोधला प्रथिनांचा कोड अन् मिळाले नोबेल; डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर मानकरी
15
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
16
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
17
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
18
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
19
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
20
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जुन्या छत्रपती संभाजीनगरात आज निर्जळी

By मुजीब देवणीकर | Published: January 01, 2024 2:19 PM

सिडको-हडकोसह जुन्या शहरातील पाणीपुरवठा अगोदरच विस्कळीत झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर : जुन्या शहराची तहान भागविणाऱ्या ७०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला पाच ठिकाणी गळती असल्यामुळे सोमवारी सकाळी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार आहे. तब्बल दहा तास दुरुस्तीचे काम चालणार असून, पाणीपुरवठ्याचे टप्पे एक दिवस पुढे ढकलण्यात आले. नवीन वर्षाच्या प्रारंभीच शहराला निर्जळीचा सामना करावा लागणार आहे.

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच शनिवारी जायकवाडी पंप हाऊस येथे सकाळी ११ वाजता विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रविवारी शहरातील अनेक वसाहतींना पाणीपुरवठा होऊ शकला नाही. सिडको-हडकोसह जुन्या शहरातील पाणीपुरवठा अगोदरच विस्कळीत झाला आहे. त्यात रविवारी सायंकाळी जुन्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला पाच ठिकाणी मोठे लिकेज असल्याचे समजले. लिकेज मोठे असल्यामुळे शहरात अत्यंत कमी प्रमाणात पाणी येत आहे. ढोरकीन पंप हाऊस, ढोरकीन प्राथमिक आरोग्य केंद्र, ढाकेफळ फाटा, फरशी नाला आणि नक्षत्रवाडी पंप हाऊस या पाच ठिकाणी लिकेज असल्याचे मनपा पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले.

सोमवारी सकाळी १० वाजता पाचही ठिकाणी एकाच वेळी दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार आहे. दुरुस्तीसाठी जवळपास दहा तास लागणार आहेत. दिवसभर ७०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीद्वारे येणारे पाणी बंद राहील. सोमवारी जुन्या शहरात ज्या वसाहतींना पाणी देण्यात येणार होते, त्यांना आता मंगळवारी पाणी देण्याचे आश्वासन महापालिकेने दिले आहे.

४९ वर्षे जुनी जलवाहिनी१९७२-७३ च्या दुष्काळानंतर हर्सूल तलावाचे पाणी शहराला कमी पडू लागले. त्यामुळे युद्धपातळीवर १९७४ मध्ये जायकवाडीहून ७०० मिमी जलवाहिनीद्वारे शहरात पाणी आणण्यात आले होते. ४० एमएलडी पाणी शहरात येत होते. या जलवाहिनीला ४९ वर्षे होत आहेत. जलवाहिनीची जाडी अनेक ठिकाणी अत्यंत कमी झाली. किंचितही धक्का लागला तर ती फुटते. पर्याय नसल्यामुळे ही जलवाहिनी अत्यंत कमी दाबाने सुरू आहे. जेमतेम २५ ते ३० एमएलडी पाणी जलवाहिनी शहराला देते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी