शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

२ महिन्यांत निर्धन रुग्णांवर उपचार नाही; ५० टक्के धर्मादाय रुग्णालयांचा गोरगरिबांना ‘ठेंगा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 13:25 IST

१० धर्मादाय रुग्णालयांपैकी काही रुग्णालयांनी आरक्षित खाटांच्या संख्येपेक्षाही कमी रुग्णांवर उपचार केले.

छत्रपती संभाजीनगर : धर्मादाय रुग्णालयांमधील प्रत्येकी १० टक्के खाटा या निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्यात येतात. मात्र, शहरातील ५० टक्के धर्मादाय रुग्णालयांनी दोन महिन्यांत एकाही निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णावर उपचार केले नसल्याचे उघडकीस आले. शिवाय काही धर्मादाय रुग्णालयांमध्येही संख्या दाखविण्यापुरतेच उपचार होतात.

शहरातील धर्मादाय रुग्णालयांनी दोन महिन्यांत धर्मादाय योजनेअंतर्गत किती रुग्णांवर उपचार करण्यात आले, याची माहिती अधिकारातून विचारणा करण्यात आली. तेव्हा २२ पैकी १२ रुग्णालयांमधील रुग्णसंख्या ‘निरंक’ दाखविण्यात आली. उर्वरित १० रुग्णालयांनी या योजनेत लाभ मिळालेल्या रुग्णांची संख्या दर्शविली.

आरक्षित खाटांच्या निम्म्या रुग्णांवर उपचार१० धर्मादाय रुग्णालयांपैकी काही रुग्णालयांनी आरक्षित खाटांच्या संख्येपेक्षाही कमी रुग्णांवर उपचार केले. निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी प्रत्येकी २१ खाटा आरक्षित असताना दोन महिन्यांत अवघ्या १० रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. काही रुग्णालयांनी चांगली सेवा देत खाटांपेक्षाही अधिक रुग्णांवर उपचार केले.

मनमानी पद्धतीने बिल आकारणीछत्रपती संभाजीनगरातील २२ धर्मादाय रुग्णालयांपैकी १२ रुग्णालयांनी दोन महिन्यांत एकाही रुग्णाला धर्मादाय (चॅरिटेबल) योजनेचा लाभ दिला नाही. माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती मिळाली. रुग्णांची संख्या निरंक दाखवण्यात आली आहे. रुग्णहक्काची सनददेखील अनेक ठिकाणी लावलेली नाही. धर्मादाय रुग्णालय असूनही अनेक ठिकाणी मनमानी पद्धतीने बिल आकारले जात आहे.- कुंदन लाटे, जिल्हा समन्वयक, रुग्ण हक्क परिषद

ऑनलाईन प्रणालीद्वारे माॅनिटरिंगधर्मादाय रुग्णालयांसंदर्भात पोर्टल तयार केले जात आहे. ऑनलाइन प्रणालीद्वारे माॅनिटरिंग केले जाणार आहे. आचारसंहितेनंतर त्याचे उद्घाटन होईल. कुठे, किती बेड शिल्लक आहेत, हे सर्वसामान्यांना सहजपणे कळेल. काॅल सेंटरद्वारेही ही सगळी माहिती घेता येईल.- रामेश्वर नाईक, कक्ष प्रमुख, राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष

निर्धन रुग्ण : पूर्णपणे मोफत उपचार- उत्पन्न मर्यादा (वार्षिक १.८० लाख रुपये)- १० टक्के राखीव बेड

दुर्बल घटकातील रुग्ण : सवलतीच्या दरात उपचार-उत्पन्न मर्यादा (वार्षिक ३.६० लाख रुपये)-१० टक्के राखीव बेड

आवश्यक कागदपत्रे-शिधापत्रिका किंवा-दारिद्र्यरेषेखालील पत्रिका किंवा-वार्षिक उत्पन्नाचे तहसीलदारांचे प्रमाणपत्र.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटल