शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

उपमहापौरपद निवडणूकीबाबत महाआघाडीचे ठरेना; भाजप देणार उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 12:09 PM

शिवसेना स्वत: निवडणूक लढविणार का? मित्रपक्षांना उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देमहापालिकेत आजपासून अर्ज वितरण ३१ रोजी होणार मतदान

औरंगाबाद : भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी राजीनामा दिला. त्यांच्या रिक्त पदाची निवडणूक ३१ डिसेंबर रोजी घेण्यात येत आहे. त्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. उद्या गुरुवारपासून उमेदवारी अर्जाचे वितरण होणार आहे. २७ डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अद्याप काही ठरले नाही. शिवसेना स्वत: निवडणूक लढविणार का? मित्रपक्षांना उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पाणीपुरवठा योजनेला स्थगिती दिल्याचा निषेध म्हणून उपमहापौर विजय औताडे यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे उपमहापौरपदासाठी ३१ डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. २६ डिसेंबरला नामनिर्देशनपत्रांचे वितरण केले जाईल तर २७ डिसेंबरला भरलेली नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. एकीकडे निवडणूक प्रक्रिया सुरू होत असताना उपमहापौरपदी कोणाची वर्णी लागणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. राज्यातील नव्या समीकरणानुसार उपमहापौरपद मिळावे, अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात येत आहे.

महापालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक सदस्य असल्यामुळे शिवसेना ठरवील त्याच पक्षाचा उपमहापौर होणार आहे. मात्र शिवसेनेने अद्याप निर्णय घेतलेला नाही. बहुमतासाठी ५६ नगरसेवकांची गरज आहे. मागील महापौर निवडणुकीत सेनेने ७७ मते मिळविली होती. महापालिकेत काँग्रेसचे १२ नगरसेवक आहेत. उपमहापौरपदाची  उमेदवारी मिळावी म्हणून नगरसेवकांनी आतापासूनच नेत्यांकडे लॉबिंग सुरू केली आहे. अवघ्या दोन महिन्यांसाठी उपमहापौर होण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. 

भाजप ‘नीती’कडे लक्षभाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी यापूर्वी आम्ही उपमहापौर निवडणुकीत उमेदवार देणार असे जाहीर केले आहे. भाजपसोबत गजानन बारवाल यांची अपक्ष आघाडीही आहे. या आघाडीचा उमेदवार देऊन एमआयएम पक्षाचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्नही होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येतो. भाजपसोबत जाणे एमआयएम पक्षाला परवडणारे नाही.

सेनेसोबत प्राथमिक चर्चाशिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यासोबत महाविकास आघाडीसंदर्भात चर्चा झाली आहे. काँग्रेसला उपमहापौरपद मिळावे, अशी मागणी करण्यात आली असून, अद्याप काही कळविण्यात आलेले नाही. काँग्रेसला संधी मिळाली तर नाव पक्षाकडून निश्चित करण्यात येईल.- नामदेव पवार, शहराध्यक्ष काँग्रेस

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस