शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

विकासाची नव्हे, दुर्लक्षाची ‘हद्द’ वाढली !

By admin | Published: December 29, 2014 12:54 AM

उस्मानाबाद : ना ग्रामसभा़़ ना दवंडी़़ थेट उस्मानाबाद शहराच्या हद्दवाढीत समावेश! सहा वर्षांत काय दिलं ? तर मुख्य मार्गासह दलित वस्ती या दोन ठिकाणी रस्ते तेही नावाला!

उस्मानाबाद : ना ग्रामसभा़़ ना दवंडी़़ थेट उस्मानाबाद शहराच्या हद्दवाढीत समावेश! सहा वर्षांत काय दिलं ? तर मुख्य मार्गासह दलित वस्ती या दोन ठिकाणी रस्ते तेही नावाला! अन् काही खांबावरील पथदिवे़़ गावातील एकही रस्ता धड नाही़़़ देवळासमोरून गटारीचं पाणी वाहतय़़़ त्या पाण्यातूनच देवळात जावं लागतय़़ झोपडपट्टी भागात वर्षभरापासून पाण्याचा थेंबही पोहोचलेला नाही़़ अशा एक ना अनेक समस्यांचा पाढा हद्दवाढीत उस्मानाबाद शहरात समाविष्ठ झालेल्या राघुचीवाडी येथील नागरीकांनी ‘लोकमत’शी बोलताना वाचला ! गावात घंटागाडी येत नाही, ना लोकप्रतिनिधीकडून विचारणा होते, अशी खंतही अनेकांनी व्यक्त केली़सन २००८ मध्ये उस्मानाबाद शहराची हद्दवाढ झाली़ शहरापासून साडेसहा ते सात किलोमीटर अंतरावर वसलेल्या राघुचीवाडी या गावाचा समावेश झाला़ राघुचीवाडी ग्रुपग्रामपंचायतीत असलेल्या केकस्थळवाडी आणि जाधववाडी ही गावेही शहराला जोडण्यात आली़ गावाचा शहरात समावेश झाल्यापासून ग्रामस्थांनी याला विरोध सुरू केला आहे़ साधारणत: २५०० लोकवस्तीच्या या गावात ना धड रस्ता, ना पिण्याच्या पाण्याची सोय आहे! एक ना अनेक समस्यांनी ग्रामस्थांना ग्रासले आहे़ गावातील नागरिकांच्या प्रश्नांबाबत ‘लोकमत’ने रविवारी प्रत्यक्ष ग्रामस्थांशी संवाद साधला़ त्यावेळी ग्रामस्थांनी अनेक प्रश्न समोर मांडले़ गावात प्रवेश केल्यानंतर साधारणत: ८० मीटरपर्यंत सिमेंटचा रस्ता आहे़ प्रारंभी गावातील चांगले वाटणारे रस्ते नंतर खड्डे आणि दगडामुळे चालायलाही नकोशे वाटतात़ गावातील एकही गटार व्यवस्थित नसल्याने पाणी रस्त्यावरूनच वाहत आहे़ गावाच्या मध्यभागी असलेल्या मारूती मंदिराच्या पायऱ्या चढायच्या म्हटले तरी गटारीचे पाणी तुडवतच मंदिरात जावे लागते़ गावात ठिकठिकाणी कचरा पडलेला दिसून येतो़ नगर पालिकेने घंटागाडीद्वारे कचरा उचलण्याची सोय केली़ मात्र, राघुचीवाडी गावात कधी घंटागाडी फिरकलीच नाही़ स्वच्छता कर्मचाऱ्यांचाही पत्ता नाही़ परिणामी गावातील स्वच्छतेच्या समस्या कायम आहेत़ गावाच्या कडेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टाकी उभारण्यात आली आहे़ ही टाकी कालबाह्य झाली असून, ठिकठिकाणी गळती लागली आहे़ टाकी केव्हा कोसळेल याचा पत्ता नाही़ त्यामुळे परिसरातील रहिवाशांची झोप उडाली आहे़ अशा धोकादायक टाकीत पाण्याचा साठा करून अर्ध्या गावाला पुरवठा होत आहे़ झोपडपट्टी भागातील पाणीपुरवठ्याची पाईपलाईन खराब झाली आहे़ त्यामुळे दारात नळ असतानाही गत वर्ष-दीड वर्षापासून ग्रामस्थांना हातपंपाचे पाणी भरावे लागत आहे़ गाव पालिका हदीत गेल्याने अनेक शासकीय योजनांचा लाभ घेताना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, गावाला पुन्हा ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात यावा, या संदर्भात हायकोर्टात याचिकाही दाखल केली असल्याचे ग्रामस्थांतून सांगण्यात आले.न.प.ची पावती, नाव ग्रामपंचायतीचेराघुचीवाडी येथील विठ्ठल शंकर कसपटे यांनी आॅगस्टमध्ये आठ अ साठी ९३० रूपये व १५० रूपये असा विविध करांचा भरणा केला आहे़ त्याबद्दल पालिकेने त्यांना पावती दिली असून, ग्रामपंचायत राघुचीवाडी हा उल्लेख त्यावर आहे़ केवळ गावाचे नाव असते तर ठिक मात्र, त्यात ग्रामपंचायतीचा उल्लेख असल्याने गावात राहतो की शहरात राहतो ? हा प्रश्न कायम असल्याचेही अनेकांनी सांगितले़ तर भरत माळी यांनी अंबुबाई माळी यांच्या नावावर आठ अ काढण्यासाठी तीन-चार महिन्यापूर्वी ६८०० रूपये पालिकेत भरले आहेत़ चार महिने झाले मात्र, विविध कारणास्तव प्रमाणपत्र दिले नसल्याचे भरत माळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ (प्रतिनिधी)