औरंगाबाद: मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करा, मराठा समाजासोबत मुख्यमंत्र्यांनी लाईव्ह चर्चा करा, असे आवाहन मराठा क्रांती ठोक मोर्चाने केले.
कोणी समन्वयक म्हणजे मराठा समाजाचा मालक नाही. मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साडे चार कोटी मराठा समाजासोबत लाइव्ह चर्चा करा. समाजाला देखील कळायला हवे मुख्यमंत्र्यांचे काय विचार आहेत. एका खोलीतील बैठकीत निर्णय आता नको, थेट समाजाला त्यांच्यासाठीचे निर्णय कळायला हवेत. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासाठी काय करणार याचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, तसेच कोपर्डीच्या भगिनींना न्याय कधी देणार अशी भूमिका रमश केरे पाटील यांनी मांडली.