जागतिक महिला दिनानिमित्त ‘सजग’तर्फे कोरोना काळातील अनुभव कथन हा कार्यक्रम घेण्यात आला. लॉकडाऊनचा काळ सुख आणि दु:ख देणारा ठरला, स्त्री-पुरुष भेदभाव प्रकर्षाने जाणवला, काही नात्यांमध्ये दुरावा आला, तर काही जणांना एकमेकांसोबत वेळ घालविण्याची संधी मिळाल्याने आपलेपणा वाढला. अतिकामाने महिलांचे आरोग्य बिघडले, तर काही ठिकाणी कामाची उत्तम विभागणी नकळतपणे होऊन गेली, अशा संमिश्र भावना महिलांनी मांडल्या.
प्रत्यक्ष संवाद नसल्याने विद्यार्थ्यांवर परिणाम झाला आहे, असे सांगत डॉ. स्मिता अवचार यांनी अनलॉकनंतर सध्या सुरू असलेल्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीविषयी मत मांडले. कुटुंबांची आणि विशेषत: महिलांची बिघडलेली आर्थिक परिस्थिती याविषयीही या कार्यक्रमात भाष्य करण्यात आले.
ज्योती नांदेडकर, ॲड. गीता देशपांडे, डॉ. रश्मी बोरीकर, मंगल खिंवसरा, आरतीश्यामल जोशी, सुनीता जाधव, मीना खंडागळे, शकिला पठाण, नंदिनी ओपळकर, सरस्वती जाधव यांनी कोरोनाकाळात आपापल्या क्षेत्रात झालेले बदल सांगितले.