शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
3
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
4
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
5
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
6
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
7
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
8
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
9
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
10
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
11
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
12
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
13
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
14
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
15
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
16
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
17
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
18
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
19
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
20
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."

वयोवृद्ध नाही तर लहान मुलांनाही मोतीबिंदू होतो; कारण काय?

By संतोष हिरेमठ | Published: January 14, 2024 11:15 AM

गदी एक दिवसाच्या बाळाला व त्यापेक्षा मोठ्या मुलांनादेखील मोतीबिंदूचा धोका असतो.

छत्रपती संभाजीनगर : मोतीबिंदू म्हटले की म्हातारपणीच होणारा आजार, असा अनेकांचा समज आहे. परंतु अगदी एक दिवसाच्या बाळाला व त्यापेक्षा मोठ्या मुलांनादेखील मोतीबिंदूचा धोका असतो. त्यामागे अनेक कारणे आहेत. परंतु मुलाला मोतीबिंदू आहे, म्हणून पालकांनी घाबरून जाता कामा नये. वेळीच उपचार घेतल्यास मुलांची दृष्टी सुरक्षित राहते, असे नेत्रतज्ज्ञ म्हणाले.

मोतीबिंदू म्हणजे काय?मोतीबिंदू म्हणजे डोळ्यातील नैसर्गिक भिंग (लेन्स) धुरकट होणे, पांढरे पडणे होय. उत्तम दृष्टीसाठी नैसर्गिक भिंग पूर्णतः पारदर्शक असणे आवश्यक असते. या लेन्सची पारदर्शकता मोतीबिंदूमध्ये कमी होते आणि रुग्णास अंधूक दिसू लागते.

कारणे काय?प्रामुख्याने वयोमानामुळे मोतीबिंदू होतो. त्याबरोबरच मधुमेह, डोळ्यांवर अतिनील किरणांचा मारा, डोळ्यांना जखम, अधिक काळ सूज राहणे, आनुवंशिकता आदींमुळे मोतीबिंदू होऊ शकतो.

लक्षणे काय?रात्री वाहन चालवताना समोरून येणारा प्रकाश डोळ्यांसमोर पसरल्यासारखा (ग्लेअर वा धूसरपणा) वाटणे, चष्म्याचा नंबर सतत बदलणे, दृष्टीवर परिणाम आदी लक्षणे आहेत.

मुलांनाही मोतीबिंदू का होतो?मोतीबिंदू हा फक्त ज्येष्ठांनाच होणारा आजार नाही, तर लहान मुलांनाही मोतीबिंदू होऊ शकतो. जन्मजातच अनेक मुलांमध्ये मोतीबिंदू आढळतो. पालकांकडून त्यांच्या मुलांमध्ये मोतीबिंदू येऊ शकतो. म्हणजे मोतीबिंदू हा आनुवंशिक कारणामुळेही होऊ शकताे. जन्मजात मोतीबिंदूची अनेक कारणे असू शकतात. ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता, गरोदरपणात आईला रुबेलाची लागण होणे आदी बाबी त्यासाठी कारणीभूत ठरतात.

घाटीत आठवड्याला १५ बालकेघाटीतील नेत्ररोग विभागाच्या प्राध्यापिका डाॅ. वैशाली उणे-लोखंडे म्हणाल्या, आठवड्यातील दोन दिवसांच्या ओपीडीत मोतीबिंदू असलेली किमान १५ ते २० मुले येतात. घाटीत मुलांमधील मोतीबिंदूसह तिरळेपणा आणि इतर दृष्टीदोषावर उपचार होतात.

१० हजार मुलांमागे दोघांना मोतीबिंदूसाधारपणे १० हजार मुलांमागे दोघांना मोतीबिंदू आढळतो. काहींना जन्मजात असतो. तर काहींना जन्मानंतर होतो. त्यामागे अनेक कारणे आहेत. लहान मुलांच्या मोतीबिंदूवर शहरात उपचार उपलब्ध आहेत.- डाॅ. मनोज सासवडे, नेत्ररोगतज्ज्ञ

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealth Tipsहेल्थ टिप्स