शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

पाऊस नव्हे, अंदाजही ढगातच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 5:23 AM

हवामान खात्याने वर्तविलेले सर्व अंदाज खोटे ठरवत पावसाने ढगातच दडी मारल्याने मराठवाड्यातील शेतक-यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

मयूर देवकर ।औरंगाबाद : हवामान खात्याने वर्तविलेले सर्व अंदाज खोटे ठरवत पावसाने ढगातच दडी मारल्याने मराठवाड्यातील शेतक-यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.मान्सूनचे अनुमान काढताना हवामान खात्य२ाने यंदा चांगला पाऊसकाळ असल्याचे भाकित वर्तविले होते. यंदा मे महिन्याच्या मध्यापासूनच मान्सून नेहमीपेक्षा आधी येणार, राज्यात धो धो पाऊस पडणार, असे आशादायी वातावरण निर्माण करण्यात आले होते. ३० मे रोजी केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या. २ किंवा ३ जूनपर्यंत राज्यात मान्सून दाखल होणार असे सांगण्यात आले; पण सर्वांचे अंदाज चुकवत मान्सून केरळमध्येच रेंगाळला. जूनच्या पहिल्या आठवड्यात जोरदार रोहिण्या बरसल्यामुळे हवामान खात्याने मान्सूनपूर्व पावसालाच मान्सून घोषित करण्याची घाई करून शेतकºयांना खोटी आशा दाखवली. पाऊस दाखल झाला असे समजून शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर खरिपाची लागवड केली. वेळेच्या आता पाऊस दाखल होण्याचे भाकित खोटे ठरवून जून महिन्याच्या मध्यावर मान्सून बरसला. त्यामुळे शेतकºयांचे खूप नुकसान झाले.१४ व १५ जून रोजी औरंगाबादमध्ये ७४.६ मि.मी. पाऊस पडला. त्यानंतर मराठवाड्यात पावासाने १५ दिवस दड२२ी मारली. असे एकामागे एक पावसाचे अनुमान चुकत गेले. त्यामुळे शेतकºयांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली. पाण्याअभावी पिके करपू लागली. शेतीकामे, खते, बी-बियाणे, डोक्यावर कर्जाचा डोंगर अशा कात्रीत सापडून बळीराजा हवालदिल झाला. काही शेतकºयांनी आपली जीवनयात्रा संपविली. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये खरीप पेरणीत अंदाजे २ हजार कोटींचे नुकसान झाल्याचे अनुमान आहे.जुलै महिना तर शेतकºयांची अग्निपरीक्षा पाहणाराच ठरला. मुंबईतील कुलाबा वेधशाळेने १५ जुलैनंतर मराठवाड्यात पावसाचे पुनरागमन होण्याची घोषणा केली. परंतु ही आशादेखील फोल ठरली. औरंगाबामध्ये १० जुलैनंतर आजतागायत एकदाही दिवसभरात ८ मि.मी पाऊसदेखील पडलेला नाही. पिकांनी माना टाकल्या आहेत. मराठवाड्यात आतापर्यंत केवळ ३८ टक्के पाऊस पडला आहे. अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाºयाची समस्या निर्माण झाली आहे.>पावसाचा अंदाज आणि वस्तुस्थितीयंदा ९६ टक्के पाऊस पडेल सध्या तरी तशी स्थिती नाही२ किंवा ३ जून रोजी मान्सूनचे आगमन अंदाज चुकला, मान्सून केरळमध्येच रेंगाळला१५ जुलैनंतर मराठवाड्यात पाऊस अंदाज खोटा ठरला२०१५ साली ९३ टक्के पाऊस प्रत्यक्षात ८६ टक्के पाऊस२०१३ साली ९८ टक्के पाऊस प्रत्यक्षात १०६ टक्के पाऊस>शेतकºयांची न्यायालयात धाव : हवामान खात्याच्या लहरी अनुमानांना कंटाळून माजलगाव तालुक्यातील गंगाभीषण थावरे या शेतकºयाने दिंदू्रड पोलीस ठाण्यात कुलाबा व पुणे वेधशाळांनी शेती उत्पादन कंपन्यांशी मिळून खोटे अंदाज वर्तवून शेतकºयांची फसवणूक केल्याची तक्रार केली आहे. तसेच धुळे जिल्ह्यातील शेतकºयांनीदेखील खोट्या भाकितांमुळे कोट्यवधींचे नुकसान झाल्यामुळे या वेधशाळांविरोधात न्यायालयात जाण्याची घोषणा केली होती.>१९ आॅगस्ट रोजी अतिवृष्टीचे भाकीतपुणे वेधशाळेने १९ आॅगस्ट रोजी मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे सुमारे ५० दिवस ओढ दिल्यानंतर आता तरी ढग बरसतील, अशी आशा निर्माण झाली आहे.