ते जिजाऊ मंदिर, म्हाडा कॉलनी येथे मराठा सेवा संघातर्फे आयोजित शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत ह़ोते. विभागीय अध्यक्ष डॉ.आर.एस. पवार हे होते. घुमरे यांच्या व्याख्यानाला जोडून कार्यकर्त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ.श्रीकांत पाटील, डॉ.वैशाली पाटील यांनी ही तपासणी केली.
स्वप्निल घुमरे यांनी शाहू महाराजांच्या जीवनातील अनेक उदाहरणे देत व फुले- शाहू- आंबेडकर या महामानवांच्या जीवनातील साधर्म्य स्थळे स्पष्ट केली. मंचावर मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा वैशाली कडू, प्रसिद्ध वक्त्या ॲड.वैशाली डोळस, डॉ.सुभाष बागल, ज्ञानेश्वर अंभोरे आदींची मंचावर उपस्थिती होती. यावेळी विविध पदांच्या नियुक्त्या जाहीर करून पत्रे देण्यात आली.
मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द झाल्यानंतर, एससीचे पदोन्नतीतील आरक्षण आणि ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात आले. हे जाणूनबुजून करण्यात आले, असा अपप्रचार सुरू आहे. याला मराठा सेवा संघातर्फे नीट उत्तर देण्यात येईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.