शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

चोरांनी नव्हे, मालकांनीच केला हायवा चालकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 10:58 PM

पंखा आणि डिझेल चोरीच्या संशयावरून चक्क मालकानेच त्याच्या मित्रांच्या मदतीने हायवा चालकाचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. चोरट्यांनी मारल्याचा बनाव करणाऱ्या वाहन मालकाला गुन्हे शाखेने अटक केली असून, पसार झालेल्या तीन आरोपींचा शोध सुरू केला.

ठळक मुद्देऔरंगाबाद गुन्हे शाखेने केला आरोपींचा बनाव उघड : एक मारेकरी अटकेत, तीन पसार

औरंगाबाद : पंखा आणि डिझेल चोरीच्या संशयावरून चक्क मालकानेच त्याच्या मित्रांच्या मदतीने हायवा चालकाचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. चोरट्यांनी मारल्याचा बनाव करणाऱ्या वाहन मालकाला गुन्हे शाखेने अटक केली असून, पसार झालेल्या तीन आरोपींचा शोध सुरू केला.मनोज बद्रीनाथ डव्हारे पाटील, नील काकासाहेब काकडे पाटील, दत्ता भांगे, शुभम पाटील (सर्व रा. संजयनगर) अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी मनोज डव्हारे यास पोलिसांनी अटक केली. नितीन ऊर्फ बाळू भीमराव घुगे (२४, रा. देवपुळ, ता. कन्नड, ह. मु. जाधववाडी) याचा खून झाला होता. नितीन ऊर्फ बाळू हा मनोजच्या हायवावर चालक म्हणून दोन महिन्यांपासून काम करीत होता. त्याला गंभीर जखमी अवस्थेत आरोपी मनोज आणि त्याच्या साथीदारांनी घाटी रुग्णालयात दाखल केले तेव्हा मध्यवर्ती जकात नाका येथे चोरट्यांच्या मारहाणीत तो जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले होते. शिवाय तशा प्रकारची माहिती त्याने दुसºया दिवशी पोलिसांना दिली होती. नितीनला घाटीत दाखल केल्यानंतर आरोपीचे अन्य साथीदार पसार झाले होते. संशयावरून आरोपी मनोजला रात्री दहा वाजेच्या सुमारास ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. निरीक्षक मधुकर सावंत यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीपुढे शरणागती पत्करत रात्री गुन्ह्याची कबुली त्याने दिली. त्याने सांगितले की, बाळू हा काही दिवस काल्डा कॉर्नर येथील नील पाटीलच्या फ्लॅटवर राहण्यास गेला होता. त्यानंतर तो जाधववाडी येथील भावाच्या घरी राहण्यास गेला. या काळात त्याने फ्लॅटमधील पंखा आणि काही सामान चोरले होते. शिवाय त्याच्यावर डिझेल चोरीचा संशय होता. ही बाब त्याचा मित्र नील पाटीलला समजल्याने त्याने चोरलेले सामान आणून देण्याचे सांगितले. मात्र बाळू आला नव्हता. त्याचा त्याला प्रचंड राग आला होता. गुरुवारी (दि.२०) रात्री त्याने मनोजला सांगून बाळूला फ्लॅटवर बोलावून घेतले. मनोज, त्याचा मित्र रवी आणि मयूर वैष्णव यांनी जाधववाडीतील फ्लॅटमध्ये नेल्यानंतर नील पाटीलने बाळूला लाकडी दांडा आणि हाताने बेदम मारहाण केली. त्यावेळी शुभम आणि दत्ता हे उपस्थित होते. या मारहाणीत बाळू बेशुद्ध होताच, नीलच्या सांगण्यावरून त्याला कारमधून घाटीत दाखल केल्याची कबुली मनोजने दिली. पोलीस निरीक्षक सावंत, उपनिरीक्षक विजय पवार, पोहेकॉ. मच्छिंद्र ससाणे, परचंडे, गावंडे, पिंपळे, सातपुते, दाभाडे आणि ढंगारे यांनी ही कारवाई केली.आरोपी मनोज पाटीलविरुद्ध फसवणुकीचा गुन्हाआरोपी मनोज पाटील याच्याकडे एक हायवा ट्रक आहे, तर नील पाटीलकडे सात हायवा आहेत. शहरातील कचरा वाहतूक करण्याचे कंत्राट मनोजकडे आहे. एक वर्षापूर्वी त्याला रॉयल्टीच्या पावतीत खाडाखोड करून वाळू वाहतूक करताना गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांनी पकडले होते. याप्रकरणी त्याच्याविरोधात जवाहरनगर ठाण्यात गुन्हा नोंदविला होता.आरोपीला दिले सिडको पोलिसांच्या ताब्यातआरोपी मनोजने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्या रिपोर्टसह त्याला रात्री सिडको पोलिसांच्या ताब्यात दिले. तत्पूर्वी सिडको पोलिसांनीही याप्रकरणी मृताच्या भावाची फिर्याद नोंदवून घेतली होती. पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विश्वनाथ झुंजारे तपास करीत आहे.चौकट- दृश्यम चित्रपटासारखा जबाब देण्याचा प्रयत्नदोन वर्षांपूर्वी अजय देवगण अभिनीत दृश्यम चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील कथानकानुसार नायक खून केल्यानंतर पकडल्या जाऊ नये म्हणून तो आणि त्याचे कुटुंबीय एकसारखा बनावट घटनाक्रम पोलिसांना सांगतात. तशाच प्रकारचा बनावट घटनाक्रम पोलिसांना सांगण्यासाठी आरोपींनी एका कागदावर उतरविला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, त्याआधीच आरोपी तेथून पळून गेले होते. मात्र त्यांनी एका कागदावर उतरविलेला बनावट घटनाक्रम पोलिसांच्या हाती लागला. जो घटनाक्रम शुक्रवारी आरोपीने पोलिसांना सांगितला होता.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी