लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : इयत्ता सातवी व नववी वर्गाच्या पुनर्रचित अभ्यासक्रम प्रशिक्षणाला गैरहजर राहणाºया १५ शिक्षकांना जि़प़ च्या शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे़ शिक्षण सभापती तथा उपाध्यक्ष भावनाताई नखाते यांनी प्रशिक्षणाला भेट दिल्यानंतर ही बाब समोर आल्याने गरुड यांनी ही कारवाई केली़शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करण्याच्या अनुषंगाने इयत्ता सातवी व नववीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाबाबत डायटमार्फत १८ ते २६ सप्टेंबर या कालावधीत शिक्षकांना प्रशिक्षण देणे सुरू आहे़ या अनुषंगाने १९ सप्टेंबर रोजी सेलू येथील नूतन विद्यालयात सेलू, पाथरी व मानवत या तीन तालुक्यांतील शिक्षकांच्या सुरू असलेल्या प्रशिक्षण शिबिरास जि़प़ उपाध्यक्षा भावनाताई नखाते यांनी भेट दिली असता, ९ शिक्षक प्रशिक्षणाला गैरहजर असल्याचे निदर्शनास आले़ त्यानंतर जिंतूर येथील ज्ञानेश्वर विद्यालयात सुरू असलेल्या प्रशिक्षणासही भावनाताई नखाते यांनी भेट दिली असता तेथेही सहा शिक्षक गैरहजर असल्याचे दिसून आले़ याबाबतची माहिती शिक्षणाधिकारी आशा गरुड यांना दिली़ त्यानंतर या १५ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे़ त्यामध्ये गैरहजर राहण्यामागचे कारण तातडीने लेखी स्वरुपात कळविण्यास सांगण्यात आले असून, समाधानकारक खुलासा नसल्यास कठोर प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे़
प्रशिक्षणाला गैरहजर १५ शिक्षकांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 12:36 AM